जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…आता सहाय्यक फौजदारास मारहाण,दोघांवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे )

   कोपरगाव शहरात काल झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तब्बल नऊ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असताना रात्री पावणे अकरा वांजेच्या सुमारास गंभीर गुन्ह्यातील काही आरोपींनी कोपरगाव उपकारागृहात आपापसात हाणामारी केली असल्याचे वृत्त मिळाले असता ती हाणामारी सोडविण्यासाठी सहाय्यक फौजदार यशवंत भीमराव पांडे (वय – 51)हे घटनास्थळी भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपीं किरण अर्जुन आजबे व मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड यांनी त्यांनाही शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची बातमी हाती आली आहे.

सदर घटनास्थळी महिला अधिकारी धावत आल्या असता त्यांनी त्यांनाही मारहाण करून विनयभंग केला असल्याच्या बातम्या शहरात पसरल्या होत्या.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने याबाबत संबधित महिला अधिकारी व तहसीलदार महेश सावंत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सदर बातमी फेटाळून लावली आहे.

  

कोपरगाव येथील उपकारागृह.

कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.शहरात आणि तालुक्यात अनेक घोटाळे उघड होत आहेत.आधी वाळू माफियानी तालुक्यात हैदोस घातला असताना असताना कर्मवीरनगर येथे एकाचा सायंकाळच्या सुमारास खुन पाडला होता.आता रेशन मफियानी आपले डोके वर काढले आहे.त्यांनी एकमेकांविरुद्ध दिवसा ढवळ्या गोळ्या घातल्या आहेत.त्यात आ.काळे यांचे स्विय सहाय्यक अरुण जोशी यांचे नाव एक जखमी आरोपी तन्वीर रंगरेज याने घेऊन शहरात खळबळ उडवून दिली आहे.त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश यांचे मक्तेदारी महाराष्ट्र आता मोडीत काढतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे.याबाबत विवेक कोल्हे यांनी आपल्या समर्थकांसह तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन सदर नाव घेतलेल्या संशियतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना सोमवार दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी हाणामारीची घटना घडल्यानंतर दि.19 सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ मंदिरासमोर एकमेकांना गाड्या आडव्या लावून थेट एकमेकावर गोळीबार घडले आहे.त्यातील एक आरोपी तनवीर रंगरेज हा गंभीर जखमी झाला असून अन्य आठ आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली असली तरी त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था किती नीचांकी पातळीवर गेली हे पुन्हा एकदा उघड झाले असल्याचे मानले जात आहे.

  

“राज्यात अन्यत्र तालुका पातळीवर कुठेही उपकारागृह नाहीत मात्र ते कोपरगाव तालुक्यात असून सदर ठिकाणी या इमारती जीर्ण झालेल्या आहेत;त्या दुरुस्त करण्याची गरज आहे.सदर ठिकाणी कैद्यांची मोठी संख्या असते त्यामुळे वारंवार तक्रारी होताना दिसून येत आहे.त्यासाठी सदर कैदी नगर जिल्हा वा नाशिक येथील जेल मध्ये हस्तांतरीत करण्याची गरज आहे”- महेश सावंत,तहसीलदार,कोपरगाव.

  दरम्यान काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे हे आपले सहकारी सहाय्यक फौजदार संदीपान गायकवाड, पो.हे.को.सगळगिळे,पो.को.गुंजाळ आदी पोलिस कर्मचारी हे कोपरगाव येथील उपकारागृहात कर्तव्यावर असताना कोपरगाव उपकारागुहात गुन्हेगारांची मोठी वर्दळ असते त्यातील काही गंभीर गुन्ह्यातील झोडगे मळा,नागरदेवळे येथील आरोपी किरण अर्जुन आजबे व गांधीनगर कोपरगाव येथील आरोपी मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड हे ही तेथे होते.त्यांनी सदर कारागृहात असलेला अन्य आरोपी दिपक आत्माराम निंबाळकर यांस काही कारणांनी मारहाण करत होते.त्याची भणक कर्तव्यावर असलेल्या पांडे यांना लागली होती.त्यांनी तातडीने उपकारागुहाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांनी यांनी मारहाण होत असलेल्या आरोपी दिपक निंबाळकर यांस बाहेर घेण्याचा प्रयत्न केला होता.त्याचा आरोपींना राग आला असल्याचे दिसून आले असून त्यांनी सहाय्यक फौजदार पांडे यांनाही शिवीगाळ केली व आणखी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी सहाय्यक फौजदार पांडे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबधित दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-424/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 121 (1)132,352,351,(2)(3) प्रमाणे दोनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस उप विभागीय अधिकारी शिरीष वमने,शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

  

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close