जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

संशयावरून मौलानास मारहाण,गुन्हा दाखल,चर्चेला उधाण !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

   देशभर बांगलादेश अल्पसंख्याक समाजावर (हिंदुंवर)होत असलेल्या अन्यायामुळे भारतभर संतप्त वातावरण असताना कोपरगाव तालुक्यातील भोजडे हद्दीत रेल्वे चौकीजवळ काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास वर्गणी गोळा करण्याच्या संशयावरून मोहमंद गुफरान नसिमुद्दीन शेख (वय-36) या एका बिहारी मौलानास (!) मारहाण केली असल्याबाबतचा गुन्हा दोन अज्ञात इसमावर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील जखमी मौलाना छायाचित्रात दिसत आहे.पाहिले छायाचीत्र संकल्पित.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सदर मौलाना यांचेजवळ अल्पवयीन मुलांचे हातपाय बांधलेले व्हिडिओ आढळले असल्याची अफवा सामाजिक संकेत स्थळावर दिसून येत होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही.


  
    वर्तमानात बांगलादेश मधील हिंदुंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध भारतभर संतप्त वातावरण निर्माण झालेले आहे.त्यातच सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे वादग्रस्त (?) विधान केलं आहे.त्यावरून दोन समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक ठिकाणी रामगिरिजी महाराज यांचे विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे.तर धोत्रे येथे सदर गुन्हे मागे घ्यावे म्हणून कोपरगावसह दोन दिवसापूर्वी हिंदू समाजाने ‘हिंदू आक्रोश मोर्चाचे ‘ आयोजन केले होते.त्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील 26 गावात मोठ्या प्रमाणावर बंद पाळण्यात आला होता.अद्यापही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक असल्याचे दिसून येत असून आणखी एका आंदोलनाची तयारी करत आहे.त्यातच हे कमी की काय काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास काल भोजडे हद्दीत भोजडे चौकी येथे दोन संशयित बिहारी मौलाना संशयास्पद स्थितीत फिरताना आढळुन आले आहे.त्यातील एकास त्याच भागातील दोन अज्ञात इसमांनी त्यांना लाकडी काठी,बेल्ट आदींच्या सहाय्याने मारहाण केली असल्याचा त्यांचा आरोप असून त्यात सदर मौलाना गंभीर जखमी झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यास उपचारार्थ कोकामठाण हद्दीतील जंगली महाराज आश्रमाच्या ‘आत्मा मालिक’ या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

   दरम्यान या प्रकरणी सदर मौलाना मोहमंद गुफरान नसिमुद्दिन शेख (वय -36) रा.मदनपुर,तालुका जिल्हा-अररिया,बिहार,हल्ली मुक्काम मोहमदिया मस्जिद,कोपरगाव याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

     दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.372/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 118 (1),115(2) 352 प्रमाणे दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस हे.को.जे.पी.तमनर हे करीत आहेत.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सदर मौलाना यांचेजवळ अल्पवयीन मुलांचे हातपाय बांधलेले व्हिडिओ आढळले असल्याची अफवा सामाजिक संकेत स्थळावर दिसून येत होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही.ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.दरम्यान सदर गढूळ वातावरण शांत करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंतांनी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close