जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चार दरोडेखोर जेरबंद,दोन फरार,शहर पोलिसांना मोठे यश 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहरात मध्यरात्री एकच्या सुमारास शहर पोलिस आपली गस्त घालत असताना त्यांना बाबा चौकात सहा संशयित तरुण आढळून आले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांचेकडे एक रिक्षासह बॅग,दोन कोयते,चाकू,पक्कड आदी दरोड्याचे साहित्य आढळून आले असून त्यांना पोलिसांनी त्यांच्याकडील चीजवस्तुसह अटक केली असून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी त्यातील तुषार अभय गोरडे,येवला रोड,कोपरगाव,मंदार अशोक लोखंडे,भारत सुभाष ब्राम्हणे,दोघे रा.पुणतांबा,अमोल लक्ष्मण जाधव,व दोघे अनोळखी इसम रा.शिंगणापूर आदींना अटक केली आहे.

दरम्यान या चार संशयित चोरट्यांना आज पोलीस उपनिरीक्षक हांडोरे यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायलयाने त्यांना दि.23 ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोपरगाव तालुक्यासह राज्यात दुष्काळाची चाहूल लागल्याने अलीकडील काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागातही तीच स्थिती आहे.शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळके शिवारात एका रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे.तर वंदना अशोक थोरात यांचे सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले आहे.त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.धोंडेवाडी या ठिकाणी रात्री पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे.तर धामोरी,माहेगाव देशमुख,कोळगाव थडी आदी परिसरात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी,जलपरी आदी चोरण्याचा धडाका उठवला आहे.त्यातील एकही चोर अद्याप हाती आलेला नाही.मात्र आज पहाटेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबा चौकात आज पहाटे 12.55 वाजता काही संशयित तरुण उभे असलेले आढळून आले होते.त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांचेकडे एक रिक्षा (क्रं.एम.एच.17 ए.जी.2101),त्यात एक बॅग,एक कोयता,एक चाकू,एक पक्कड आदी साहित्य आढळून आले असल्याने ते चोरीच्या उद्देशाने उभे होते हे उघड झाले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेली रिक्षा दिसत आहे.

  दरम्यान या घटनेत पोलिसांनी तुषार अभय गोरडे,(वय-24)येवला रोड,कोपरगाव,मंदार अशोक लोखंडे,(वय -23)भारत सुभाष ब्राम्हणे,(वय -24)दोघे रा.पुणतांबा,अमोल लक्ष्मण जाधव,(वय -24) व अन्य दोघे अनोळखी इसम रा.शिंगणापूर आदीं विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.363/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (4) अन्वये दाखल केला असून यातील पहिल्या चार जणांना अटक केली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली नूतन पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करीत आहेत.

दरम्यान या चार संशयित चोरट्यांना आज पोलीस उपनिरीक्षक हांडोरे यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायलयाने त्यांना दि.23 ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यात त्यांचा तपास होणार असून त्यांचा उद्देश स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close