गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलास पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे )
कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव-उक्कडगाव रस्त्याने सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शाळेतून घरी जात असताना दोन आरोपींनी दुचाकीवर येऊन आपला मुलगा पुष्पराज निकम (वय -10 वर्षे 3 महिने ) यास पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याचा गुन्हा उत्तम विष्णू निकम (वय-44) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागास आला असून उक्कडगाव शिवारात आज सकाळी 09.30 वाजता अल्पवयीन मुलगा पुष्पराज निकम हा शाळेतून घरी येत असताना उक्कडगाव शिवारात अशोक बाबुराव शिंदे यांच्या वस्तीसमोर दोन इसम आपल्या हिरो-होंडा अचिव्हर गाडीवर आले व त्यांनी त्यास पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अफवांचे पीक जोरदार आल असताना मुलं पळविणाऱ्या चोरांच्या टोळीच्या अफवेमुळे काही वर्षांपूर्वी अख्खा जिल्हा भयभीत झाला होता.या अफवांमुळे निर्दोष नागरीकांना मारहाणीच्या घटना वाढल्या होत्या.अफवांमुळे आत्तापर्यंत काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.वाट्सअॅप वरून मुलं चोरून नेणारी आली आहे अशी अफवा पसरवली जात होती.मुलांचा प्रश्न असल्याने साहाजिकच सर्व लोक यावर लवकर विश्वास ठेवत होते मात्र याचा दाहक अनुभव नुकताच कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागास आला असून उक्कडगव शिवारात आज सकाळी 09.30 वाजता फिर्यादी उत्तम निकम यांचा अल्पवयीन मुलगा पुष्पराज निकम हा शाळेतून घरी येत असताना उक्कडगाव शिवारात अशोक बाबुराव शिंदे यांच्या वस्तीसमोर दोन इसम आपल्या हिरो-होंडा अचिव्हर (क्रं.एम.एच.17 ए.के.793 ) वरून आले व त्यांनी सदर मुलाजवळ जात,”बेटा इधर ऑओ,हमारे साथ गाडीपर बैठो;तुझे स्कूल छोड डते है” असे म्हणून फिर्यादीनुसार मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या प्रकरणी मुलगा घाबरून गेला होता.त्याच्या ओरडण्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने ग्रामस्थांनी आरोपींना पकडले आहे.दरम्यान सदर आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कठोराबाजार येथील असून त्यांची नावे अस्लम अजमेर पठाण,शरीफखान मस्तानखान पठाण असून त्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली असून त्याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी उत्तम निकम यांनी गुन्हा दखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.286/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 137(2),62 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक महाजन व पो.हे.कॉ.एन.एस.शेख यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पो.हे.को.शेख हे करीत आहेत.