आंदोलन
…या शेतकऱ्यांकडून ‘समृद्धी’ उद्घाटन सोहळ्यास विरोध !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात लोकार्पण होत आहे.या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वावी येथे समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवत लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला आहे.
“राज्य सरकारने समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करून उद्घाटन करणे आवश्यक होते.समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.शेतांमध्ये जायला सेवा रस्ते नाहीत,पावसाचे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले आहे त्याला जाण्यासाठी जागा नाही परिणामस्वरूप पाणी थेट शेतांमध्ये शिरत आहे,समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे.यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे हे दुर्दैवी आहे”-विजय शिंदे,आंदोलक शेतकरी,सायाळे,ता.सिन्नर.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.त्या विरोधात कोपरगाव व सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.त्याचे पडसाद नुकतेच सिन्नर तालुक्यातील वावी जवळ उमटले आहे.त्यातून शेतकऱ्यांनी आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास काळे झेंडे दाखवून विरोध केला आहे.
त्या ठिकाणी आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे की,”राज्य सरकारने समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करून उद्घाटन करणे आवश्यक होते.समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.शेतांमध्ये जायला सेवा रस्ते नाहीत,पावसाचे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले आहे त्याला जाण्यासाठी जागा नाही परिणामस्वरूप पाणी थेट शेतांमध्ये शिरत आहे,समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे.यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना राज्य सरकारकडून व रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित करण्यात येत आहेत.
सदर प्रकरणी मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्वराज्य पक्ष,छावा संघटना,शेतकरी संघटना आदी संघटनांच्या माध्यमातून एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या समृद्धी लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला आहे.महामार्गावर येत शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला.राज्य सरकार व रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करण्यात आली आहे.त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मात्र उपस्थित पुढाऱ्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली आहे हे विशेष !