नैसर्गिक आपत्ती
पावसाने जीवित हानी,कोपरगाव तहसीलदारांचा दौरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
येत्या ४-५ दिवसांमध्ये कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्या प्रमाणे उत्तर नगर जिल्ह्यात पावसाने कहर उडवला असून डाऊच खुर्द शिवारात वीज पडून एक गाय आणि एक कालवड मृत्युमुखी पडली आहे संवत्सर शिवारात दशरथ कारभारी जाधव यांचे दोन मेंढरं व तीन कोकरे यांना पावसाच्या तडाख्यात जीव गमवावा लागला आहे.या शिवाय त्याच गावात गावठाण हद्दीत ‘लक्ष्मीनगर’ वस्तीत घरकुल योजनेत पाणी शिरून अनेकांच्या संसारात पाण्याने कहार केला आहे.व चीजवस्तू पाण्यात वाया गेल्या आहे.या शिवाय ‘जंगली पीर’ वस्तीजवळ चांगदेव रानडे,भाऊसाहेब गांगुर्डे,साहेबराव गांगुर्डे यांच्या झोपडीत पाणी गेले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.
डाऊच बुद्रुक शिवारात बापूराव सखाहारी दहे यांच्या शेडलगत वीज पडून त्यात जर्शी गाय व कालवड मृत्युमुखी पडली आहे त्याचे छायाचित्र.
दरम्यान या पावसामुळे किती नुकसान झाले याचा महसुली अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या बाबतचा अहवाल तयार करावा व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचा सविस्तर अहवाल तयार करून त्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी दुध संघ.
भारतीय वेधशाळेने येत्या ४-५ दिवसांमध्ये कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्या प्रमाणे उत्तर नगर जिल्ह्यात पावसाने कहर उडवला आहे.तसंच पुढचे पाच दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव अंतिम टप्यात आल्यावर हा जोर वाढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
कोपरगाव तालुक्यात काल पहाटे चारच्या सुमारास पावसाने पोहेगाव,जवळके,वेस,सोयगाव,मनेगाव,काकडी,अंजनापूर,बहादरपूर,धोंडेवाडी,डोऱ्हाळें,कोऱ्हाळे आदी ठिकाणी पावसाने कहर केला होता.त्यात अंजनापूर शिवारातील माती बंधारा फुटला आहे.नैऋत्येकडील सर्व पाझर तलाव,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,नाला बल्डिंग तुडुंब भरुन वाहू लागले आहे.तर सायंकाळी सहा वाजेनंतर सुमारे अडीच ते तीन तास पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.त्यातले त्यात संवत्सर शिवारात जास्त तडाखा दिला आहे.
संवत्सर शिवारात पावसाने केलला कहर छाया चित्रात दिसत आहे. छाया-शिवाजी गायकवाड.
दरम्यान या पावसाने नेमके किती नुकसान झाले यांचा अंदाज घेण्यासाठी आज सकाळीच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.मात्र त्यांनी संवत्सर गावात हि पाहणी केली मात्र ज्या भागात जास्त नुकसान झाले त्या ठिकाणी ते पोहचले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
या शिवाय डाऊच बुद्रुक व खुर्द शिवारातही हा प्रकोप कायम होता.यात वीज पडुन बापुराव साखाहारी दहे यांची गाय आणि कालवड मृत्यूमुखी पडली आहे.तर आदिवासी वस्ती असलेल्या शिवाजी नगर येथे आदिवासी वस्तीत पाणी घुसले आहे.याशिवाय बहादराबाद शिवारात माती बंधाऱ्यात जास्त पाणी आल्याने शेतकऱ्यांनी त्याची वाट मोकळी करून दिली असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील शहापूर तलावातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे त्याचे छायाचित्र.
दरम्यान या पावसाने नेमके किती नुकसान झाले यांचा अंदाज घेण्यासाठी आज सकाळीच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.मात्र त्यांनी संवत्सर गावात हि पाहणी केली मात्र ज्या भागात जास्त नुकसान झाले त्या ठिकाणी ते पोहचले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.दरम्यान कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्यात याबाबत नुकसानी बाबत माहिती घेतली असता अन्य कुठेही जीवित हानी नसल्याची माहिती दिली आहे.
जेऊर पाटोदा हद्दीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सोयाबीन मध्ये पाण्याचा कहर झाला आहे.तेथील शेतकरी उमाकांत धुमाळ यांच्या शेतीतील छायाचित्र.
दरम्यान या पावसामुळे किती नुकसान झाले याचा महसुली अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या बाबतचा अहवाल तयार करावा व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचा सविस्तर अहवाल तयार करून त्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी दुध संघ.