जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एक इसम मृत,घात की आत्मघात,उलटसुलट चर्चेला उधाण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी जवळ दौंड मनमाड रेल्वे मार्गावर आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे त्याचा मृत्यू हा आत्महत्या की घातपात यावर कोपरगाव शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे दाखल झालेले पोलीस अधिकारी दिसत आहे.

  

  रेल्वे अधिकाऱ्यांनी आज कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खबरी नुसार सदर इसमाने आज दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे गाडी क्र. डी.एन.२७२६१/२७३६४ बी.एल.एन.ई.एक्स.समोर येऊन आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे ही आत्महत्या असल्याची बाब उघड होत आहे.मात्र मयत इसमाची ओळख अद्याप पटू शकली नाही.

  कोपरगाव तालुक्यात गत सप्ताहात भोजडे हद्दीतील एक इसम रेल्वे रुळावर मृत अवस्थेत आढळून आला होता.त्यानंतर पंधरा दिवसातील ही दुसरी घटना उघड झाली आहे.सदर घटनेत मयत इसमाचा चेहरा विद्रूप झालेला दिसून येत असून त्यामुळे तो अपघात की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे.

घटनास्थळी दिसत असलेली सायकल दिसत आहे.

   मयताच्या अंगात फिक्कट लाल रंगाचा शर्ट दिसत असून त्याच्या अंगात राखाडी रंगाची पँट दिसून येत आहे.घटनास्थळी त्याची लाल रंगाची एक सायकल आढलून आली आहे.तिच्या चेन कव्हरवर एम्प्रेस (EMPRESS ) अशी इंग्रजी अक्षरे दिसून येत आहे.खालच्या बाजूस जय हिंद ही मोठी अक्षरे दिसून येत आहे तर त्यासमोर सायकल मार्ट कोपरगाव अशी मराठी अक्षरे दिसत आहे.त्यामुळे सदर इसम कोपरगाव आणि परिसरातील असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा पो.हे.को.जे.पी.तमनर आदींनी भेट दिली आहे.


   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव रेल्वे स्थानक प्रबंधक संतोष कुमार मोतीलाल उत्तम (वय -५६) यांनी शहर पोलिसांना दिलेल्या खबरीत क्रं.४९/२०२४ बी.एन.एस.एन.१९४ प्रमाणे सदर इसमाने आज दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे गाडी क्र. डी.एन.२७२६१/२७३६४ बी.एल.एन.ई.एक्स.समोर येऊन आत्महत्या केली असल्याची खबर नोंदवली आहे.त्यामुळे ही आत्महत्या असल्याची बाब उघड होत आहे.मात्र मयत इसमाची ओळख अद्याप पटू शकली नाही.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखली पो.हे.को.तमनर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close