जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचे अपहरण,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा हद्दीतील संजयनगर येथील रहिवासी फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी (वय-१७ वर्षे) अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून केली असल्याची फिर्याद अपहरित मुलीच्या आईने (वय-३२)यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने जेऊर पाटोदा आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

अल्पवयीन मुलींवर होणा-या अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच मुलींना विविध प्रकारचे स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत.राज्यातील विविध शाळांमध्ये पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.तरीही अल्पवयीन मुलींचे अपहरणाच्या घटना होतच आहे.कोपरगाव नजिक अशी घटना उघड झाली आहे.

  अल्पवयीन मुलींवर होणा-या अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच मुलींना विविध प्रकारचे आमिष दाखवून विविध व्यवसायात ढकलले जात आहे.ही गंभीर समस्या लक्षात घेत,हे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांकडून मुलींनी वाईट स्पर्श कसा ओळखावा,याचे धडे दिले जात आहेत.राज्यातील विविध शाळांमध्ये पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.तरीही अल्पवयीन मुलींचे अपहरणाच्या घटना होतच आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरानजीक जेऊर पाटोदा हद्दीत उघड झाली आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

   त्यात फिर्यादी महीलेने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”आपण आपल्या कुटुंबासह जेऊर पाटोदा हद्दीत संजयनगर येथे रहात असून आपले अन्य अपत्यासह एक अल्पवयीन मुलगी असून ती दि.१० जुलै २०२४ रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ०५ वाजेपासून घरी कोणालाही काहीही एक न सांगता गायब झाली असून ती कोणतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार,रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३१५/२०२४ नवीन भारतीय न्याय संहिता कलम ३३७(२) अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमख यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पावर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close