जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

स्वतःच्या पत्नीवर चाकूने हल्ला,एकावर गुन्हा 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   आरोपीच्या पत्नीने सोबत सासरी येण्यास नकार दिल्याने आरोपी सुभाष हिरामण सोनवणे रा.सोयेगाव ता.नांदगाव याने हिंसक बनून आपली पत्नी संगीता सोनवणे (वय-२२) गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून स्वतःचे गळ्यावर स्वतः चाकूने वार करून जखमी केल्या प्रकरणी आरोपी सुभाष हिरामण सोनवणे याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे चासनळी परिसरात खळबळ उडाली आहे.

  

आरोपी जावई हा दि.११ जुलै २०२४ रोजी आपल्या पत्नीस घेण्यासाठी पत्नीच्या मामा कडे आला होता; मात्र पत्नीने त्याच्याबरोबर येण्यास नकार दिल्याने तो दुखावला गेला होता.त्यातून घरातील कांदा कापण्याच्या चाकूने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला चढवला.त्यात त्याने तिच्या गळ्यावर वार केला होता.त्यात ती जखमी झाली होती.ती गंभीर जखमी झाली असल्याचे पाहून त्याने स्वतःच्या गळ्यावर त्याच चाकूने वार करून स्वतःला जखमी केले आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी अण्णा वामन बर्डे (वय-५५) हे चासनळी येथील रहिवासी असून मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतात.त्यांची भाची संगीता सोनवणे ही आहे.तिचे लग्न काही वर्षांपूर्वी नांदगाव तालुक्यातील सोयेगाव येथील आरोपी भाचे जावई सुभाष सोनवणे याचे बरोबर लावून दिले होते.सुरुवातीच्या नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांच्यात विविध कारणावरुन वाद निर्माण होऊ लागले होते.त्यातच ती कायमच्या भांडणाला वैतागून आपल्या मामाकडे निघून आली होती.ती मामाकडे आली याचा राग जावई सुभाष सोनवणे यास आला होता.त्यावरून दि.११ जुलै २०२४ रोजी आपल्या पत्नीस घेण्यासाठी पत्नीच्या मामा कडे आला होता; मात्र पत्नीने त्याच्याबरोबर येण्यास नकार दिल्याने तो दुखावला गेला होता.त्यातून घरातील कांदा कापण्याच्या चाकूने त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला चढवला होता.त्यात त्याने तिच्या गळ्यावर वार केला होता.त्यात ती जखमी झाली होती.ती गंभीर जखमी झाली असल्याचे पाहून त्याने स्वतःच्या गळ्यावर त्याच चाकूने वार करून स्वतःला जखमी केले असल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
   या प्रकरणी मुलीचे मामा अण्णा बर्डे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी जावई सुभाष सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.गंभीर जखमी भाचीवर उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने,पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस उपनिरीक्षक एम.जे.महाजन यांनी भेट दिली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२५४/२०२३ नवीन भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) ,३५२,३५१(२(३)) अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदशनाखाली पो.उपनिरीक्षक महाजन हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close