जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गुन्हामागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   
   कोपरगाव शहरात बुधवार दि.२२ मे रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास दोन गटात घडलेल्या हाणामारीचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी आरोपी सनी गायकवाड याचेसह तिघांनी फिर्यादीचे मुलाने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी फिर्यादिस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना नुकतीच घडली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

  

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”बुधवार दि.२२ मे रोजी रात्रीच्या सुमारास गांधींनगर आणि हनुमाननगर परिसरात दोन गटात हाणामारी घडली होती.या प्रकरणी पहिला गुन्हा फिर्यादी महिला सुनीता रमेश भोपे (वय-४७) रा.हनुमाननगर यांनी तर दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी अमीर मोहंमद पठाण (वय-२७) रा.हनुमाननगर यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यात आरोपी आरिफ मुहंमद पठाण,युसूफ शेख उर्फ डल्ली,तन्वीर शेख,मंडी फिरोज,अमजद मणियार,आवेश मणियार सर्व रा.कोपरगाव व इतर अनेक अनोळखी इसम यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला होता.तर दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी सनी गायकवाड,बंटी रमेश भोपे,निलेश दादा पवार,जितू खांडेकर,राहुल जोगदंड आदीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.यातून मोठा राडा झाला होता.या प्रश्नी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचेसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.


   दरम्यान या प्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल होणे असतांना वीस दिवसाच्या आत दि.११ जून रोजी दुपारी ०४.१५ वाजता आरोपी सनी गायकवाड व त्याचे सोबत इतर दोघे (यांची नावे माहिती नाही) यांनी मावळा चौफुली हनुमाननगर या ठिकाणी फिर्यादी मोहंमद अहमद पठाण (वय-४५) रा.हनुमान नगर यांना तुमच्या मोठया मुलाने (अमीर पठाण) “आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून तो मागे घे नाही तर तुम्हाला मारून टाकू”अशी धमकी देऊन शिवीगाळ केली आहे.

  दरम्यान या गुन्ह्यास दोन जातीधर्माची तेढ असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४२६/२०२४ भा.द.वि.कलम ५०४,५०६ प्रमाणे तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   या प्रकरणी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पावरा हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close