जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महसुली कर्मचाऱ्यांवर वाळूचोरांचा हल्ला,दोन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   वाळू चोरांची वाहने पकडली जात असताना त्याची माहिती महसूल विभागास दिली असल्याच्या संशयावरून मळेगाव थडी येथील एकाच घरातील तिघांना मारहाण झाल्याची घटना ताजी असताना काल रात्री वेळापूर शिवारात कोपरगाव तहसीलच्या वाळू विरोधी पथकातील कर्मचारी संकेत अनिल पवार (वय-३७) योगेश दत्तात्रय साळुंके (वय-४०) या दोघांना गंभीर मारहाण करून जखमी केले असल्याची घटना उघड झाली असून यातील आरोपी कैलास देवराम कोळपे,आकाश मदने,सुनील मेहेरखांब आदी तीन जणांवर कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते (वय-३४) यांनी गुन्हा दाखल केला असला तरी यातील संघटित गुन्हेगारीतील हद्दपार प्रमुख आरोपीचे नाव मात्र वगळले असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

दरम्यान यातील एम.पी.डी.ए.तील प्रमुख हद्दपार गुन्हेगार कोळपे हा या गुन्ह्यात सामील असल्याची विश्वसनीय माहीती असून त्याला मात्र महसुली अधिकाऱ्यांनी अभय का दिले ? याचे नागरिकांना कोडे पडले आहे.त्यावर आधीच अनेक वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले असून अनेक पोलिसांना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकवले असल्याची माहिती आहे.

   राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण गतवर्षी दि.०१ मे २०२३ पासून हाती घेतले होते.त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले ती काही महिने झाले नाही तोच सरकारने आचारसंहिता लागण्याआधी वाळूचे दर बेसुमाररित्या वाढवले असून आत अधिकृत वाळू जवळपास ४ हजार ५०० ते ०५ हजार रुपयापर्यंत पोहचली आहे.यात सामान्य माणसाला सलवतीच्या दरात वाळू मिळण्याचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरले आहे.त्यात लाभार्थ्यांच्या ऐवजी संबंधित नेते व महसुली अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे होत असल्याचे दुर्दैवाने नागरिकांना पाहायला मिळत आहे.परिणामी सहाशे रुपये दराची वाळू हे स्वप्नच ठरले असल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे.त्यामुळे स्वाभाविकच चोरट्या वाळूस चंद्रबळ मिळाल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव,राहाता तालुका त्यास अपवाद नाही.त्यामुळे वाळू डेपो आणि उपसा केंद्राच्या ठिकाणी चोरटी वाळू मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यासंबंधी सुरेगाव,सांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा ही वाळू बंद करण्याची अनेकवेळा निवेदने आणि लेखी इशारे देऊनही कोणताही परिणाम झालेला नाही.उलट वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत असून यातून वाळू चोरांचे मोठ्या प्रमाणात चंद्रबळ आणखी वाढले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत असून ते कोणासही जुमनासे झाले असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच मळेगाव थडी पाठोपाठ वेळापूर शिवारात नुकतीच उघडकीस आली असून यात तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी करण्यापर्यंत वाळूचोरांनी मजल गेली आहे.

संकल्पित छायाचित्रे.

  

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांचेशी संपर्क साधला असता हल्ला करणारे आठ आरोपी असल्याची माहिती देऊन त्यात सदर आरोपी होता किंवा नाही या बाबत आपण अनभिज्ञ असून तो असला तर त्याचा पोलिसांनी गुन्ह्यात समावेश करावा अशी मागणी केली आहे.


  यातील फिर्यादी कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते या आपले महसुली कर्मचारी संकेत अनिल पवार व योगेश दत्तात्रय साळुंके आदींना घेऊन काल म्हणजेच दि.०८ जून रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास आपल्या कर्तव्यावर असताना सुरेगाव हद्दीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रवेशद्वाराचे समोर व माहेगाव देशमुख हद्दीत  मारुती मंदिरासमोर त्यांना एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा दोन चाकी ट्रेलरसह ट्रॅक्टर ०५ हजाराची एक ब्रास वाळू चोरी करताना आढळून आला होता.त्यांचे बरोबर एक हिरो कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच.१७ सी.एफ.३६४२) एक पांढरे रंगाची मराठीत क्रमांक असलेली मारुती स्विफ्ट कार आढळून आली होती.त्यास ताब्यात घेऊन सदरचे पथक रवाना झाले असताना वरील ठिकाणी वरील आरोपींनी संगनमत करून महसुली कर्मचारी संकेत पवार,योगेश साळुंके यांना आरोपी  कैलास देवराम कोळपे,आकाश मदने,सुनील मेहेरखांब आदी तीन जणांनी सदर ट्रॅक्टर अडवून त्या वरील कर्मचारी यांना खाली ओढून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. व त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेला आहे.व सरकारी कर्मचारी यांना सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा गुन्हा फिर्यादी नायब तहसीलदार सातपुते यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

   दरम्यान यातील प्रमुख आरोपी कोळपे हा या गुन्ह्यात सामील असल्याची विश्वसनीय माहीती असून त्याला मात्र महसुली अधिकाऱ्यांनी अभय का दिले ? याचे नागरिकांना कोडे पडले आहे.त्यावर आधीच अनेक वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले असून अनेक पोलिसांना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकवले असल्याची माहिती आहे.त्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संघटित गुन्हेगारी अंतर्गत (एम.पी.डी.ए.) हद्दपार केले असताना ही घटना घडली आहे.त्याबाबत तालुक्यात उलतसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान उशिराने दिलेल्या माहितीनुसार संबंधिताने,” आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याची माहिती कळवली असून यात आपले नाव काही जण द्वेषमूलक पद्धतीने नाहक देत असल्याचा” दावा केला आहे.

   

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांचेशी संपर्क साधला असता हल्ला करणारे आठ आरोपी होते.मात्र त्यात असा आरोपी होता किंवा नाही या बाबत आपण अनभिज्ञ असून तो असला तर त्याचा पोलिसांनी गुन्ह्यात समावेश करावा अशी मागणी केली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२२४/२०२४ भा.द.वि.कलम ३९५,३५३,३३२,५०४,५०६,३४१,३७९ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३,१५ प्रमाणे वरील तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महाजन आदींनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close