आरोग्य
कोपरगांवात…या दिवशी मोफत सर्व रोग निदान शिबिर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथे ब्राह्यण सभा,कोपरगांव यांच्या ४० वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्व नागरीकांसाठी सर्व रोग निदान शिबिर शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९ वा.पासून ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले असल्याची माहीती एस.जे.एस.हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक प्रसाद कातकडे यांनी दिली आहे.
दरम्यान या शिबिरात बी.पी,शुगर,२ डी.ई.को,ई.सी.जी.आदी तपासण्या करण्यात येणार आहे.तथापि सदर शिबिरात गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे.या शिबिरात अनुभवी तज्ञ डाॕक्टर,प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दरम्यान शहर आणि तालुक्यातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व्यवस्थापक सचिन जानवेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.