जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एकाचा मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवारा हौसिंग सोसायटीत रहिवासी असलेले इसम दत्तू नामदेव गाडे (वय-५४) यांचा नुकताच आकस्मित मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  

उन्हाळ्यात बाहेरील दिवसाचे तापमान ४२ सेल्शियसहून अधिक असते.एरवी उन्हामध्ये शरीरातील घाम निर्माण करणारे केंद्र बाहेरील तपमान काहींही असो शरीराचे तापमान ३७.७ से.कायम ठेवतात.उन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात जसे वेल्डिंग,भटट्या,ओतकाम आल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो.वर्तमानात उष्माघाटाच्या घटना वाढल्या असून अनेकांना याचा फटका बसत आहे.अशीच घटना असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

   यात मयत इसम दत्तू गाडे यांना दि.१७ मे रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.मयताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक कन्या असा परिवार आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्र.३७/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे करण्यात आली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी भेट दिली आहे. 

   दरम्यान या संबधी आमच्या प्रतिनिधीने याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांचेकडून माहिती घेतली असता,सदर मृत्यू हा हृदय विकाराचा असल्याची माहिती दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close