गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,दोघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी एका ठिकाणी आपल्या मित्रासॊबत उभी असताना त्यास आरोपी राहुल काळू थोरात व किरण राजू शिंदे हे घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादी मुलीच्या मित्रास मारहाण करून त्यास पळवून लावून तिच्याकडुन शरीर सुखाची मागणी केली व ‘ती’,” पूर्ण केली नाही तर तुझ्या आई वडिलांना सांगून देऊ” अशी धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुले आणि मुली वयात येत असताना किंवा आल्यावर त्यांच्याकडून नकळत काही चुका घडत असतात.त्याचा गैरफायदा घेत काही असामाजिक तत्त्व या मुली अथवा मुलांच्या चुकांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याच्या घटना समाजाला काही नव्या नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.यात सदर मुलीने शहर पोलिसांना आप बिती सांगितली असून त्यातील आरोपी राहुल काळु थोरात व किरण राजू शिंदे दोघेही रा.टाकळी रोड कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर फिर्यादीत तिने म्हटले आहे की,”मंगळवार दि.३० मे २०२४ रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास आपण व आपला मित्र याचे सोबत येवला रोडवरील साईधाम अंबिकानगर कमानींजवळ उभे असताना त्या ठिकाणी वरील आरोपी राहुल थोरात व किरण शिंदे हे आले व त्यांनी फिर्यादीच्या मित्रास मारहाण केली व त्यास पळून जाण्यास भाग पाडले.व त्यांनी फिर्यादी मुलीचा हात धरून तिला अंधारात ओढत नेले व फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली व “तसे न केल्यास आपण हि घटना तुझ्या आई व वडिलांना सांगून देऊ” अशी धमकी देऊन तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२१६/२०२४ भा.द.वि.कलम ३५४,३५४(अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे २ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे.