गुन्हे विषयक
शेतकऱ्याची चोरी,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.३३३ मधील क्षेत्रातून अज्ञात चोरट्याने आपल्या विहिरीतील पाणबुडी विद्युत पंप चोरून नेला असल्याची फिर्याद शेतकरी संदीप जगन्नाथ शहाणे (वय-४२) यांनी दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्यास सुरुवात केली असल्याची उदाहरणे समोर येत आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजी ग्रामपंचायत असून या ठिकाणी अधिवास असलेले शेतकरी संदीप शहाणे हे राहत असून आपली शेती कसत आहे.त्या शेतात त्यांची विहीर असून दि.०९ एप्रिल रोजी रात्री ०८ ते दि.१० एप्रिल दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरीच्या इराद्याने आपल्या शेतातील एक सुमारे ०६ हजार रुपये किमतीची पाणबुडी विद्युत मोटार चोरून नेली आहे.आजूबाजूस आपण शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह पोलीस हे.कॉ.निजाम शेख यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.१३४/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.शेख हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणी शेतकरी वर्गात भीतीचे वातवरण पसरले आहे.