गुन्हे विषयक
१५ लाखांसाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील माहेर व नाशिक येथील सासर असलेली महिलेचे तिच्या आई-वडिलांनी मनासारखे लग्न केले नाही,लग्नात हुंडा सोने-नाणे दिले नाही म्हणून तिने आपल्या माहेराहून १५ लाख रुपये आणावे यासाठी आपला नवरा राधेश्याम श्रीराम पवार,सासरा श्रीराम रामनाथ पवार,सासू अनिता श्रीराम पवार आदिसंह ११ जणांनी लग्न झाले पासून ०९ महिने शारीरिक मानसिक छळ केला असून त्या विरुद्ध पीडित महिला कांचन राधेश्याम पवार (वय-२९) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा,१९६१ च्या कलम ४ अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी ६ महिने परंतू २ वषापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि १० हजार रुपयांपर्यत दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.तरीही या गुन्ह्यात कमी आलेली दिसत नाही.नुकतीच अशी घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील माहेर व सासर नाशिक ‘सिद्धेश्वर अपार्टमेंट’ ‘कदम लॉन्स’ जवळ सासर असलेल्या महिला कांचन राधेश्याम पवार हिचे लग्न दि.०२ जुलै २०२१ रोजी वाजत गाजत आई वडिलांनी वर राधेश्याम पवार यांचेशी लावून दिले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी आपले खरे स्वरूप दाखविण्यास सुरुवात केली होती.सुरुवातीस त्यांनी,”तुझ्या आई वडिलांनी लग्न मनासारखे केले नाही” असा आरोप केला होता.त्यानंतर,” लग्नात सोने नाणे दिले नाही त्यामुळे तू आपल्या माहेराहून १५ लाख रुपये आण” अशी मागणी केली होती.त्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला होता.व त्यानंतर तिला नांदविण्यास नकार दिला होता.या शिवाय फिर्यादी महिलेने आपल्या सासरच्या मंडळीकडे विश्वासाने दिलेले स्रिधन परत दिले नाही असा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे.
सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी नवरा राधेश्याम पवार,सासरा श्रीराम पवार,सासू अनिता पवार,ननंद दिपाली सागर साकला,नंदई सागर जगदीश साकला,रा.वैजापूर,पतीचे मामा सुरेश भानूलाल पीडियार,मामी बेबी सुरेश पीडियार,रा.शिंपी गल्ली लासलगाव,दुसरा मामा व्यंकटेश भानूलाल पिडियार,त्यांची पत्नी सपना व्यंकटेश पीडियार,रा.टागोरनगर,नाशिक रोड,नाशिक,तिसरा मामा जगदीश भानूलाल पिडियार,त्यांची पत्नी नम्रता जगदीश पीडियार रा.विंडसर वार्ड अपार्टमेंट,जनाबाई कॉलनी नाशिक रोड नाशिक आदी ११ जणांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस हे.कॉ.एस.आर लांडे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२३/२०२४ भा.द.वि.कलम ९८४(अ) ३२३,५०४,५०६,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.लांडे हे करत आहेत.