जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

व्याजाचे पैसे परत न दिल्याने एकाचे अपहरण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपेगाव येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने व्याजाचे पैसे न दिल्याने ते वसुलीसाठी जमीन नावांवर करून घेण्यासाठी त्याचे अपहरण करण्याचा प्रर्यंत केल्या प्रकरणी शरद आनंदराव दत्तू गायकवाड सह अन्य सहा जणांनी फिर्यादी शुक्लेश्वर उत्तम भुजाडे (वय-५०) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान यातील आरोपी हर्षल गवारे यांने या पूर्वी फिर्यादि कडून ५३ आर क्षेत्राची ७-८ लक्ष रुपयांना खरेदी केलेली असल्याची माहिती मिळत असून त्या रकमेतील आणखी व्याज बाकी असल्याचे बोलले जात आहे.व त्या पोटी आणखी जमीन मागत असल्याची माहिती मिळत आहे.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश-२०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे.या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली असून आता राज्यातील बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल असा आशावाद सपशेल फेल ठरला असल्याचे दिसून येत असल्याचे उदाहरण नुकतेच कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे उघड झाले आहे.

    त्याचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हे कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शरद आनंदराव गायकवाड त्याचा भाऊ दत्तू आनंदराव गायकवाड,यांचेकडून व्याजाने पैसे घेतले होते.त्यांनी आपली अडचण दूर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्याजाचे पैसे परत केले असल्याचा फिर्यादी यांचा दावा आहे.त्यांनी पैसे देऊनही आरोपी हे दि.०९ डिसेंबर,सकाळी १० वाजता व ११ डिसेंबर रोजी रात्री ०९.३० वाजता शिरसगाव व कोपरगाव हद्दीत त्यांना वारंवार आणखी पैसे मागण्याचा तगादा लावला होता.व त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांची जमीन त्यांच्या नावांवर करून घेण्यासाठी लकडा लावला होता.त्यासाठी त्यांनी फिर्यादी शुक्लेश्वर भुजाडे यांना आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे यांचे सांगण्यावरून आरोपींनीं निळ्या रंगाच्या एर्टीगा गाडीत बसवून अपहरण करून मारहाण केली होती व त्यांना डांबून ठेवले होते.त्या प्रकरणी फिर्यादी भुजाडे यांनी आरोपी शरद आनंदराव गायकवाड,दत्तू आनंदराव गायकवाड,सुनील भुजबळ,नारायण जाधव,खंडू शरद गायकवाड,हर्षल गवारे व इतर तीन अनोळखी इसम अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
   दरम्यान यातील आरोपी हर्षल गवारे यांने या पूर्वी फिर्यादि कडून ५३ आर क्षेत्राची ७-८ लक्ष रुपयांना खरेदी केलेली असल्याची माहिती मिळत असून त्या रकमेतील आणखी व्याज बाकी असल्याचे बोलले जात आहे.व त्या पोटी आणखी जमीन मागत असल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५९४/२०२३भा.द.वि.कलम सह कलम-३६५,३२७,३४६,३४७,३४८,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध  गुन्हा दखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close