जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

 
  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी व ३२ वर्ष वय असलेल्या महिलेचा आरोपी पिंटू उर्फ शिवाजी अण्णा गायकवाड रा.गांधीनगर याने विनयभंग केल्याचा गुन्हा नुकताच शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी पिंटू उर्फ शिवाजी अण्णा गायकवाड याने दि.२५ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास बळजबरीने आपल्या घरात घुसून आपल्या पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा ऊत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे म्हटले आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात.सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो.सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे.तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे.म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.या गुन्ह्यात तक्रारदार केवळ स्त्री असणे पुरेसे नसून घडलेली घटना ही सदर स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी होती हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.सदर गुन्हा हा दखलपात्र असून २ वर्षे सक्तमजुरी आणि रू.०२ हजार दंडाची शिक्षा आहे.अशी कायद्यात तरतूद असताना या गुन्ह्यात कमी आलेली नाही हे विशेष ! अशीच घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यात फिर्यादी महिलेने गुन्हा दाखल केला असून त्यात  म्हटले आहे की,”आरोपी पिंटू उर्फ शिवाजी अण्णा गायकवाड याने दि.२५ डिसेंबर रोजी रात्री  ०९ वाजेच्या सुमारास बळजबरीने आपल्या घरात घुसून आपल्या पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा ऊत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे म्हटले आहे.व तिला लाथा उक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप सदर फिर्यादीत शेवटी केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.६००/२०२३ भा.द.वि.कलम ४५२,३५४,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध  गुन्हा दखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close