गुन्हे विषयक
महिला गायब,पोलिसांत तक्रार दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी (खुर्द की बुद्रुक याचा बोध होत नाही) येथील रहिवासी महिला ज्योती शिवाजी माळी (वय-५०) हि दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेनंतर केव्हातरी गायब झाली असून त्याचे कुटुंब हवालदिल झाले असून त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नोंद केली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
देशभरात अलीकडील काळात मानवी तस्करीचा मुद्दा चिंताजनक बनला आहे.महिला आणि बालकांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण समाजापुढे एक गंभीर आव्हान बनले आहे.अनाकलनीय परिस्थितीत गायब झालेल्या मुलांचा व महिलांचा प्रश्न एका अहवालामुळे चर्चेत आला आहे.राज्यातील गायब महिलांची तीच स्थिती आहे.’द केरळ स्टोरी’या चित्रपटामुळे हा प्रश्न देशभरच्या केंद्र स्थानी व चर्चेच्या ऐरणीवर आला होता.अशीच घटना नुकतीच मढी येथे घडली आहे.
सदर कुटुंब हे शेतीची मोलमजुरी करत असून दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेनंतर झोपी गेल्यानंतर घरातील नातेवाईकांच्या पहाटे ०५ वाजेच्या सुमारास हि बाब लक्षात आली आहे.त्यांनी दिवसभर आपल्या नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
दरम्यान गायब महिलेच्या अंगात जांभळ्या रंगाची साडी व ब्लाउज काळ्या रंगाचे असून ती शरीराने सडपातळ असून रंगाने सावळी आहे.अंगावर काळ्या रंगाचा स्कार्फ असून कानात गुलाबी बाजारातील झुमके असल्याची माहिती बाळनाथ शिवाजी माळी (वय-२०) यांनी आपल्या तक्रारीत नोंदवली आहे.
अ,नगर,नाशिक जिल्ह्यात कोणाला अशी महिला आढळल्यास त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी दूरध्वनी क्रं.०२४२३-२२२२३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोकाटे हे करत आहेत.