जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेला मारहाण,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील संजयनगर या उपनगरात माहेर असलेल्या व चांदवड येथील सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून आपल्या बहिण व भावाकडून नवीन घर बांधणीसाठी ०३ लाख रुपये आणावे यासाठी तिचा आरोपी नवरा इरफान अल्ताफ मनियार,नंदई अमजद समशोद्दीन कोतवाल,नणंद शिरीन शमसोद्दीन कोतवाल,सासू नूरअफजा अल्ताफ मणियार,सासरे अल्ताफ उस्मान मणियार व दिर राजू अल्ताफ मणियार आदींनी फिर्यादीचे लग्न झाले पासून आजतागायत तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिला उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ करून केल्या प्रकरणी अफ्रिन इरफान मणियार (वय-२७) हिने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव आणि चांदवड परिसरात खळबळ उडाली आहे.

  

“आपले लग्न आपल्या पालकांनी दि.२९ जानेवारी २०२० रोजी चांदवड,हनुमाननगर येथील आरोपी नवरा इरफान मनियार याचे सोबत मोठ्या थाटामाटात संपन्न करून दिले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर साधारण तीन ते चार महिन्यांनी सासरच्या मंडळींनी आपले वास्तव दाखविण्यास सुरुवात केली होती.व माहेराहून तीन लाख रुपये नवे घर बांधणीसाठी आणावे यासाठी छळ सुरू केला होता असे म्हटले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८ (अ) या कलमाची तरतूद करण्यात आली असून.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.मात्र या गुन्ह्यात कमी आल्याचे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संजयनगर येथील माहेर व हनुमाननगर चांदवड येथे नुकतीच घडली आहे.

सदर गुन्ह्यात महिलेने आपल्या फिर्यादीत अफ्रिन मणियार हिने म्हटले आहे की,”आपले लग्न आपल्या पालकांनी दि.२९ जानेवारी २०२० रोजी चांदवड,हनुमाननगर येथील आरोपी नवरा इरफान मनियार याचे सोबत मोठ्या थाटामाटात संपन्न करून दिले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर साधारण तीन ते चार महिन्यांनी सासरच्या मंडळींनी आपले वास्तव दाखविण्यास सुरुवात केली होती.व आपल्या माहेराहून आपल्या बहिण व भावाकडून नवीन घर बांधणीसाठी ०३ लाख रुपये आणावे यासाठी तिचा आरोपी नवरा इरफान अल्ताफ मनियार,नंदई अमजद समशोद्दीन कोतवाल,नणंद शिरीन शमसोद्दीन कोतवाल,सासू नूरअफजा अल्ताफ मणियार,सासरे अल्ताफ उस्मान मणियार व दिर राजू अल्ताफ मणियार आदींनी फिर्यादीचे लग्न झाले पासून आजतागायत तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिला उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ करून केल्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे यांनी भेट दिली आहे.
              
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४७७/२०२३ भा.द.वि.कलम ४९८(अ) ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close