गुन्हे विषयक
घर उघडे,चोरट्यांनीं साधला डाव,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या अन्नपूर्णानगर येथे शिक्षणासाठी रहात असलेला औरंगाबाद सातारा परिसर येथील मूळ रहिवासी महाविद्यालयीन तरुण श्रेयस अविनाश शिंदे (वय-२२)हा आपल्या खोलीत दार उघडे ठेवून झोपी गेला असता रात्री ०१ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यावर पाळद ठेऊन त्याच्या खोलीतील सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप व एक मोबाईल असा ऐवज लंपास केला असल्याने कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सदर फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या आहेत.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.सर्वच आघाड्यावर सामसुम दिसत आहे.झगडे फाटा येथे नागरिकांनी दुचाकी चोरांना पकडले असून त्यात दोन चोरट्यांना तेथील उपस्थित नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.कोपरगाव शहरात चोऱ्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नुकतीच उघड झाली आहे.
यातील फिर्यादी तरुण हा संजीवनी येथील महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असून तो अन्नपुर्णानगर येथील खोली भाड्याने घेऊन राहात आहे.तो दि.०६ ऑक्टोबर रोजी रात्री अभ्यास आटोपून झोपी गेला असता त्या ठिकाणी त्याच्याकडून अनावधानाने दरवाजा उघडा राहून गेला होता.त्याचा फायदा अज्ञात चोरट्यानी उचलला असून त्यांनी मध्यरात्री ०१ सुमारास कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून त्याचा लॅपटॉप व एक भ्रमणध्वनी असा २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.सदरची घटना सकाळी फिर्यादी शिंदे यांच्या लक्षात आली होती.त्यांनी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.४७१/२०२३ भा.द.वि.कायदा कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.