जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…अखेर ‘त्या’ महिलेच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी विवाहित महिला संगीता कृष्णा बागुल (वय-२८) हि दि.२३ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास घरात मृत स्थितीत आढळून आली होती या प्रकरणी नुकताच तिचा नवरा कृष्णा उर्फ गणेश रंभाजी बागुल,सासरा रंभाजी अंबु बागुल,सासू सुमन रंभाजी बागुल,दीर मंगेश रंभाजी बागुल,तिची जाव पूजा मंगेश बागुल आदी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मयत विवाहित तरुण महिला संगीता बागुल हि सेंन्ट्रीग काम करणाऱ्या नवरा गणेश बागुलसह सासू सुमन बागुल,सासरा रंभाजी बागुल,दिर मंगेश बागुल,जाव पूजा बागुल आदिसंह आपल्या दोन मुलांसह गावाच्या उत्तरेस साधारण एक फर्लांगभर अंतरावर एकत्र राहत होती.मात्र तिचा मृतदेह काल दि.२३ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता घरात आढळून आला होता.तिला घरच्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून बाहेर काढले असल्याची माहिती होती.व त्यानंतर उपचारार्थ वैजापूर येथे नेले होते.मात्र तेथील खाजगी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता.व तिला सरकारी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला होता.त्यानंतर त्यांनी तिला घरी आणून नंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले होते.तिचे शव विच्छेदन केले होते.याबाबत उक्कडगाव आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

सदर उक्कडगाव येथील कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार ती दि.२३ ऑगष्ट रोजी सायंकाळी जेवण झाल्यावर भांडी घासण्यासाठी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी तिचा पाय घसरून ती पडली असल्याचा बनाव केला आहे.मात्र या उलट तिच्या माहेरच्या नातेवाईकांचा विरोधाभासी दावा होता.त्यामुळे त्यांनी तिचा अंत्यसंस्कार करण्यास खैरी निमगाव,रुई ता.राहाता येथील नातेवाईकांनी नकार दिला होता.व सदर प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून व चौकशीचा विश्वास देऊन तिच्यावर काल दि.२४ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला होता.मात्र त्या ठिकाणी तिचा नवरा,सासू,सासरे,दिर आदी हजर नव्हते.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.व तिला न्याय मिळावा अशी मागणी तिच्या रुई तालुका राहाता येथील नातेवाईकांनी केली होती.

  आधी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५४/२०२४ हि नोंद केली होती.मात्र तिचे शव विच्छेदन केल्यानंतर तो अहवाल आल्यावर पोलिसांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कडू सुखदेव बत्तीशे (वय-५२)रा.देशमुख गल्ली मांगवाडा रुई ता.राहाता यांनी वरील पाचही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले यांचेसह पोलीस हे.कॉ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या सासरच्या नातेवाईका विरुद्ध गुन्हा क्रं.४२२/२०२३ भा.द.वि.कलम ३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मीटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देसले हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close