शैक्षणिक
गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नुकत्याच जाहीर ऑनलाइन जाहीर झालेल्या परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे.जाहीर झालेल्या या निकालात विज्ञान विभागाचा निकाल ९९.०९% लागला असून आंबेकर शुभांगी नितीन ८८.८३% या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला असून शहाणे धनश्री जगदीश ८४.५०% गुण मिळवून द्वितीय स्थान मिळवले आहे तर उगले पल्लवी आबासाहेब हिने ८१.६६% गुण मिळवून तृतीय स्थानावर आपले नाव कोरले आहे.
दरम्यान वाणिज्य विभागाचा निकाल ८२.७१% लागला असून लभडे श्वेतम शंकर या विद्यार्थ्याने ८७.६७% गुण मिळवून बाजी मारली आहे.दिशा दिलीप राहणे हिने ८३.६७ % मिळवून द्वितीय स्थानावर आपला झेंडा फडकवला आहे तर श्रुती अरुण डोंगरे हिने ८१.३३% गुण मिळवून तृतीय स्थान निर्धारण केले आहे.
दरम्यान कला विभागाचा निकाल ५५.१८% लागला असून दिपाली तानाजी घायतडकर या विद्यार्थिनीने ७८.१७% गुण मिळवून नौबत झडवली आहे तर गौतमी नितीन बनसोडे हिने ७२.८३% मिळवून द्वितीय स्थानी स्थानापन्न झाली आहे तर सोनिया राजेश कदम हिने ७१.८३% गुणांसह तृतीय स्थान बळकट केले आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल ६५.२२% लागला असून अथर्व जगन्नाथ भालेकर या विद्यार्थ्याने ७५.१७% गुण मिळवून आपला प्रथम लौकिक कमावला आहे.यश गंगाधर साळुंखे ७१.००% गुणांसह द्वितीय स्थानावर आपला गौरव स्थापित केला आहे तर शेखर विजय देवकर याने ६२.८३% गुण मिळवून तृतीय स्थानी आपल्या पूर्वजांचा लौकिक पुनर्स्थापित केला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,कनिष्ठ कला विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेश काळे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.के.एम.ससाणे,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.बाबासाहेब वाघ,व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा.डी.डी.पगार यांच्यासह कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.