गुन्हे विषयक
लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेला फिर्यादीस आरोपी मंगल संतु मोरे,किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम आदिसंह नऊ जणांनी बेकायदा जमाव जमवून तेथील बस स्थानकाजवळ सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास,”लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,लाकडी स्टंप,आदींच्या सहाय्याने संपवून टाकतो” म्हणून बेदम मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी तरुण मजूर सुरेश भाऊसाहेब मोरे (वय-२४) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे रवंदेसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आरोपी मंगल मोरे व त्यांचे सहकारी आदींनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,लाकडी स्टंप,आदींच्या सहाय्याने फिर्यादि “सुरेश मोरे यास संपवून टाकतो” असे म्हणून बेदम मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी तरुण मजूर सुरेश भाऊसाहेब मोरे (वय-२४) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे
रवंदे येथील फिर्यादी सुरेश मोरे व आरोपी मंगल मोरे हे रवंदे येथील राहवासी आहेत.त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद आहेत.दि.१८ ऑगष्ट रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी हा रवंदे येथील बस स्थानकाजवळ असताना आरोपी मंगल मोरे व त्यांचे सहकारी किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम,देवा बाळू मोरे,रवींद्र सुनील निकम,दिपक बाळू साळवे,विजय अरुण मोरे,रा.रवंदे,बिपीन रमेश बनसोडे,शुभम शिंदे रा.अंदरसुल ता.येवला आदींनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,लाकडी स्टंप,आदींच्या सहाय्याने फिर्यादि “सुरेश मोरे यास संपवून टाकतो” असे म्हणून बेदम मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी तरुण मजूर सुरेश भाऊसाहेब मोरे (वय-२४) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे रवंदेसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस हे.कॉ.संदीप बोटे आदींनी भेट दिली आहे.यातील तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती तपासी अधिकारी यांनी दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंदणी पुस्तक क्रं.४१५/२०२३ भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.