जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…पुन्हा वाळूचोरांचा उच्छाद,कोपरगावात वाळू‌‌ चोरांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अवैध वाळू‌‌ चोरांवर गुन्हे दाखल,कोपरगावात तालुक्यातील घटनाकोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा एक जेसीबी आदी मालमत्ता तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने नुकतीच जप्त केली आहे.तहसीलदार भोसले यांच्या या कारवाईचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिज उपसा करून तो नेमका कोणत्या बांधकामावर जातो आहे.याची चौकशी केली जाणार असून त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे बांधकाम व्यावसायिक धास्तावले आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तत्कालीन खा.स्व.शंकरराव काळें यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता.न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले तालुक्यातील (सु) प्रसिद्ध राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून दिली असल्याचे उघड झाल्याची घटना फार जुनी नाही.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.

दरम्यान मध्यन्तरी तर या वाळूचोरीत अडथळा ठरणाऱ्या वाळू उपसा प्रतिबंधक पथकावर २९ जानेवारी २०२२ हल्ला करण्यास व जप्त वहाने पळवून नेण्यास हे वाळूचोर चुकले नव्हते.या डल्ल्यात महसूल अधिकारी,आणि कर्मचारी कमी नसल्याचे आढळून आले आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे हे हस्तकांमार्फत शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तहसील परिसरातील एका हॉटेल मध्ये २० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती.त्यानंतर वाळू चोरांना व हप्तेखोरांना आळा बसेल व त्याला आवर घातला जाईल असा समज खोटा ठरला असल्याचे नुकतेच सपशेल उघड झाले आहे.

कोपरगांव तालुक्यातील मुर्शतपुर शिवारात अवैधरित्या गौनखनिज (वाळू ) वाहतूक करणारा अंदाजे २० लाख प्रती हायवा प्रमाणे दोन हायवा ४० लाख रुपये आणि जेसीबी अंदाजे २० लाख रुपये असे एकूण ६० लाख रुपयांची वाहने जप्त केली केल्याने हि बाब उघड झाली आहे.यात तहसीलदार संदीपकुमार भोसले व त्यांचे सहकारी तलाठी श्री गटकळ,शिपाई रामदास माळवदे,भाऊसाहेब माळी,कोतवाल साहेबराव रणशूर आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिज उपसा करून तो नेमका कोणत्या बांधकामावर जातो आहे.याची चौकशी केली जाणार असून त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close