गुन्हे विषयक
आर्थिक कारणावरून हाणामारी,कोपरगावात दोन गटांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या चासनळी येथील रहिवासी असलेल्या दोन गटात आर्थिक देवघेवीच्या कारणावरून हाणामारी झाली असून यात दिलीप मारूतीराव तिडके व अनिल रामदास मातेरे यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असल्याने चासनळीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान यातील पहिल्या घटनेतील फिर्यादी दिलीप तिडके व आरोपी अनिल मातेरे हे दोघे मुंबई नेरुळ येथील मोठे ठेकेदार व नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांनी मुंबई-नागपूर या समृद्धी मार्गाचे काम केले असल्याचे समजते त्या मोठ्या आर्थिक कारणावरून हा वाद असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पहिल्या गुंह्यातील आरोपी दिलीप तिडके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,” आपण हल्ली नेरुळ येथे रहिवासी असून मूळ गाव चासनळी हे आहे.तर आरोपी अनिल मातेरे हे सावळीविहिर येथील रहिवासी असून तेही हल्ली नेरुळ येथील सेक्टर क्रं.०४ मधील रहिवासी आहे.आपण काही कारणांनी आपल्या गावी आलो असता आपले आरोपी मातेरे यांची आर्थिक देवघेव होती.त्याबाबत आपण त्यास दि.१८ ऑगष्ट रोजी सकाळी ९.३० वाजता बाजारतळ रोडवर असताना आरोपी मातेरे याने आपली गाडी अडवून वाईट-साईट शिवीगाळ केली आहे.बॅट उगारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे आपल्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घनास्थळी पोलीस हे.कॉ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.दोन्ही आरोपीस अद्याप अटक नाही मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान अशाच आशयाची फिर्याद पहिल्या गुंह्यातील आरोपी अनिल मातेरे यांनी फिर्यादी दिलीप तिडके याचे विरुद्ध दाखल करताना म्हटले आहे की,”आपल्याला तिडके याने आर्थिक कारणावरून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करून,”जर तू पैसे मागितले तर तुला जीवे ठार मारून टाकील” असा दम दिला असल्याचे म्हटले आहे.व या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी आरोपी मातेरे याचे विरुद्ध फिर्यादी दिलीप तिडके यांनी तर तिडके याचे विरुद्ध मातेरे याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.अनुक्रमे ४१२-४१३/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहे.