जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

माहिलेचा मृतदेह,कोपरगाव तालुक्यात खळबळ

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक आडामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच देर्डेसह तालुक्यात खळबळ उडाली होती.मात्र तपासाअंती सदर महिला हि कोपरगाव येथील असल्याचे पोलिसांना समजले असून सदर महिलेचे नाव लक्ष्मीबाई बाबुराव डोखे (वय-३५) असे असल्याची माहिती हाती आहे.

कोपरगाव तालुक्यातील उमरावती नदी काठी असललेल्या देर्डे कोऱ्हाळे येथील सार्वजनिक विहीर आड यामध्ये महिलेच्या प्रेत आढळले होते त्याचा शोध घेता सदर महिलेचे नाव हे लक्ष्मीबाई बाबुराव डोखे (वय- ३५) असे असल्याची माहिती हाती आलेली आहे.हि महिलेचा पतीचे निधन झाले होते.ती कोपरगाव शहरातील सुभाषनगर या उपनगरातील असल्याची माहिती हाती आली असून त्या मागे अन्य नाजूक कारण समोर आले असल्याची परिसरात चर्चा आहे.त्यासाठी पोलिसांनी मढी येथील अविवाहित तरुणास ताब्यात घेतले असल्याची माहिती हाती आली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”देर्डे कोऱ्हाळे गावातील बंधाऱ्याजवळ एक जुना आड आहे त्याच्या जवळ चप्पल ओढणी व मोबाईल अशा वस्तू एका धुणं धुण्यासाठी सकाळी ११ चे सुमारास गेलेल्या महिलेने पाहिल्या व घाबरून तिने जवळच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ही माहिती सांगितली होती.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदा दळवी,उपसरपंच आशा डुबे,ग्रामसेवक योगेश देशमुख,बाबासाहेब डुबे व सर्व सदस्य यांची मासिक सभा चालू असल्यामुळे ताबडतोब त्यांनी सभेचे कामकाज थांबून घटनास्थळी धाव घेतली व पोलीस पाटील विद्या डुबे यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला होता.

घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.ना.कोकाटे,पो.कॉ.तमनर,पो.कॉ.सानप,महिला होमगार्ड आदी सह दाखल होऊन त्यांनी शोधाशोध केली असता एका मुलीचे प्रेत काढण्यात त्यांना यश आले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.दरम्यान ही आत्महत्या दि.१३ किंवा १४ ऑगष्ट २०२३ रोजी रात्री घडली असल्याचा कयास आहे.सदर घटना हि घात आहे की अपघात आहे याविषयी उलट सुलट चर्चेला उधाण आले असताना वरील माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close