गुन्हे विषयक
कोपरगावात दिवसा ढवळ्या चोऱ्या वाढल्या,गुन्हे दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या खडकी रोडलगत एका इमारतीत असलेले नागरिक अजिंक्य लक्ष्मण कदम यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे दागिने १५-२० हजारांची रोकड असा सुमारे ०२ लाखांची चोरी झाली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आहे.या शिवाय अन्य दोन दुचाकीची चोरी उघड झाल्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
याआधी हेमंत प्रकाश चौधरी यांची १२ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ए.यू.९७१५) हि साई मंदिर तपोभूमी जवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.तर महेश बन्सी गव्हाणे (वय-३९)रा.समता नगर यांची १५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१६ बी.एल.२९४५)साई तपोभूमी पार्किग मधून चोरी गेली आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून काही दिवसापूर्वी
वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती याधीही पूनम चित्रपट गृहासमोर व व्यापारी धर्मशाळेसमोर तीन दुकाने फुटली असून एका आठवड्यात तीन दुचाकी चोरीस गेल्या असताना आज भर दुपारी दिडच्या सुमारास अजिंक्य लक्ष्मण कदम यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे दागिने १५-२० हजारांची रोकड असा सुमारे ०२ लाखांची चोरी झाली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आहे.
याआधी हेमंत प्रकाश चौधरी यांची १२ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ए.यू.९७१५) हि साई मंदिर तपोभूमी जवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.तर महेश बन्सी गव्हाणे (वय-३९)रा.समता नगर यांची १५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१६ बी.एल.२९४५)साई तपोभूमी पार्किग मधून चोरी गेली आहे.
तर फिर्यादी राजेश विठ्ठल पाटील (वय-४५) यांच्या संजय धनालाल काले या मालकाची ४० हजार रुपये किमतीची हिरो होंडा दुचाकी (क्रं.एच.एच.१७ ए.एम.१४४७)हि आरोपी मुजामिल फारूक सय्यद (वय-३४)रा.कल्लू स्टेडियम जवळ हसमपुरा मालेगाव येथील चोरटा हा चोरून नेताना नागरिकांनी पकडला आहे.या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहराचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे.