जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पाच दुचाकींसह सहा चोरटे जेरबंद,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात दुचाकी आणि चार चाकी चोरट्यांचा धिंगाणा सुरु असताना कोपरगाव शहर पोलिसांना मोठे यश मिळाले असून त्यांनी ब्राम्हणगाव येथील दोन दुचाकी चोरट्यांसह दुचाकी खरेदी करणारे धुळे जिल्ह्यातील तीन जण गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी डोकेदुखी ठरलेल्या दोन दुचाकी स्वारांचा छडा लावला आहे.त्यात दिनेश राजेंद्र आहेर (वय-३०)अजित कैलास जेजूरकर (वय-२४) दोघे रा.ब्राम्हणगाव आदींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून दुचाकी विकत घेणारे आरोपी इसम प्रवीण सुका कोळी,प्रमोद झुंबरलाल कोळी,हर्षल राजेंद्र राजपूत तिन्ही रा.उपरपिंड ता.शिवपूर जि.धुळे यांना अटक केली आहे.पोलीस अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांची झोप उडाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र परिणाम शून्य असल्याचे दिसत आहे.मधून मधून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि शिर्डी उपविभागीय अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून धाडी घालत असल्याचे दिसत आहे.काही महिन्यापुर्वी शहरातील तीन चार चाकी कार एका रात्रीत गेल्या असताना व नुकतेच येवला रोड वरील ‘साखरे स्टील’सह तीन तर व पूनम चित्रपट गृहासमोर तीन दुकाने फोडली असल्याच्या घटना ताज्या असताना व गुन्हे आणि गुन्हेगार कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आज कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी समाधानाची घटना समोर आली आहे.

सदर कारवाई हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचेमार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे,पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,पोलीस नाईक महेश गोडसे,पो.कॉ.जालिंदर तमनर,संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर भांगरे,विलास मिसाळ,एम.आर.फंड,बाळू धोंगडे,राम खारतोडे,जी.व्ही.काकडे आदींनी पूर्ण केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी डोकेदुखी ठरलेल्या दोन दुचाकी स्वारांचा छडा लावला आहे.त्यात दिनेश राजेंद्र आहेर (वय-३०)अजित कैलास जेजूरकर (वय-२४) दोघे रा.ब्राम्हणगाव आदींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून दुचाकी विकत घेणारे आरोपी इसम प्रवीण सुका कोळी,प्रमोद झुंबरलाल कोळी,हर्षल राजेंद्र राजपूत तिन्ही रा.उपरपिंड ता.शिवपूर जि.धुळे यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी क्रं.एम.एच.१५ बी.यू.१३२७,एक करड्या रंगाची होंडा शाईन दुचाकी विना क्रमांकाची,एक पिवळा-लाल पट्टा असलेली विना क्रमांकाची दुचाकी,एक पिवळा-लाल पट्टा असलेली काळ्या रंगाची विना क्रमांकाची महिंद्रा सेंच्युरी विना क्रमांकाची दुचाकी,एक काळे रंगाची बजाज कंपनीची १३५ पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१२ जी.डी.२३५४) तर काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची स्पेलंडर प्लस दुचाकी (क्रं.एच.एच.१५ जे.३६४५) आदी पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.

सदर आरोपी तेंव्हा उघड झाले जेंव्हा ब्राम्हणगाव येथील फिर्यादी धनिशराम पंडोरे यांनी त्यांची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.जी.११३४) हि चोरीस गेली असा गुन्हा क्रं.२५५/२०२३ हा दि.२४ मे २०२३ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता.सदर गुन्ह्याच्या तपास सुरु असताना चौकशी अधिकारी रोहिदास ठोंबरे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की,सदर चोरी गेलेली दुचाकी हि सिन्नर तालुक्यात विकली गेली आहे.त्यानुसार त्या चौकशी अधिकाऱ्यांनी आपले पथक सिन्नर तालुक्यात रवाना झाले होते.त्यांनी त्या ठिकाणी कसून चौकशी केली असता त्यांना तेथे संशयित इसम गणेश जेजरुकर हा हाती लागला होता.त्याच्याकडे कसून चौकशी केली असता व त्यास पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता त्याने ब्राम्हणगाव येथील दोन आरोपींची नावे सांगितली आहे.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांनी चोरी केलेली वाहने तपासात काढून दिली आहे.मात्र अद्याप कार चोर,व घरफोड्या करणारे चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असल्याचे दिसत आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचेमार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे,पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,पोलीस नाईक महेश गोडसे,पो.कॉ.जालिंदर तमनर,संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर भांगरे,विलास मिसाळ,एम.आर.फंड,बाळू धोंगडे,राम खारतोडे,जी.व्ही.काकडे आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close