जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतरही अवैध वाळू उपसा सुसाट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

एकीकडे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी प्रत्येकाला सहाशे रुपये ब्रासने वाळू जाहीर केली असताना व प्रत्यक्षात ती घोषणा तीन महिने होत आले असताना वास्तवात येत नसताना कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू चोरी सुसाट सुरु असून महसूल विभागाने त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.परिणामस्वरूप गोदावरी काठच्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे व या वाळूचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मध्यंतरी २९ जूनच्या रात्री अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जवळपास ४२.२० लाखांची मोठी कारवाई करून एक झटका वाळूचोरांना दिला होता.मात्र त्यानंतर थोडी थंडाई आल्यानंतर पुन्हा एकदा वाळूचोरांनी डोके वर काढले आहे.त्यामुळे सांगवी भुसार,माहेगाव देशमुख,मळेगाव थडी,सुरेगाव,कुंभारी,आदी ठिकाणचे शेतकरी,कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात ६०० रुपयात एक ब्रास वाळू नागरिकांना देण्यात आलेली नाही हे विशेष.आता तर पावसाळा सुरु होऊन जवळपास दिड महिना उलटल्यानंतर हि स्थिती समोर आली आहे.त्याच बरोबर कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार असल्याचा बार फुसका ठरला आहे.

आता नवीन वाळू धोरणानुसार महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूची विक्री केली जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ०१ मे २०२३ रोजी केली होती.त्यामुळे आता वाळू स्वस्तात मिळणे शक्य होणार असा नागरिकांचा विश्वास वाढला होता.यासंबंधी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी वाळूच्या अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य सरकार घरपोच वाळू देणार असल्याचे सांगितले होते.त्यामुळे बांधकाम सुरु असलेले नागरिक खुश झाले होते.मात्र त्याबाबत ग्रामसभेची शिफारस अनिवार्य करण्यात आलेली होती.त्यासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार असल्याचा बातम्या प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या.जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी गत पंधरवाड्यात केले होते.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात ६०० रुपयात एक ब्रास वाळू नागरिकांना देण्यात आलेली नाही हे विशेष.आता तर पावसाळा सुरु होऊन जवळपास दिड महिना उलटल्यानंतर हि स्थिती समोर आली आहे.त्याच बरोबर कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार असल्याचा बार फुसका ठरला आहे.त्यामुळे हा डेपो सुरु करताना ग्रामस्थांना विचारात घेतले होते का नाही ? असा गंभीर सवाल निर्माण झाला असताना याबाबत मध्यंतरी सुरेगावाचे सरपंच शशिकांत वाबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवैध वाळू बंद करावी अशी महत्वपूर्ण मागणी केली होती.व ग्रामसभेला विश्वासात घेतले नाही असा आरोपही केला होता.व वाळू उपशासाठी ठेकेदार यांचे वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक बोटी आणि तत्सम यंत्रसामग्री गावात आल्या असल्याचा इशारा दिला होता.मात्र त्याकडे महसूल विभागाने कानाडोळा केला असल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असून त्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी हैराण झाले आहे.

मध्यंतरी २९ जूनच्या रात्री अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जवळपास ४२.२० लाखांची मोठी कारवाई करून एक झटका वाळूचोरांना दिला होता.मात्र त्यानंतर थोडी थंडाई आल्यानंतर पुन्हा एकदा वाळूचोरांनी डोके वर काढले आहे.त्यामुळे सांगवी भुसार,माहेगाव देशमुख,मळेगाव थडी,सुरेगाव,कुंभारी,आदी ठिकाणचे शेतकरी,कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close