गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात आणखी लव्ह जिहादची घटना ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात,’लव्ह जिहाद’प्रकरणी मोठा ‘हिंदू जनाक्रोश मोर्चा’ संपन्न झाला असताना पुन्हा एकदा मढी फाटा येथे एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघड झाले असून सदर मुलीला कोळपेवाडी येथील मुस्लिम तरुण शिर्डीकडे घेऊन जात असताना मढी फाटा येथे त्यांचे कडाक्याचे भांडण झाले असताना सदर मामला नजीकच्या ग्रामस्थांच्या लक्षात आला व त्यांनी त्याचे चलचित्रण करून त्याचा व्ही.डी.ओ.प्रसारित केला होता.व त्यांना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले होते.तालुका पोलिसांनी सिन्नर पोलिसांना त्या बाबत माहिती देऊन तिला ताब्यात दिले आहे.मात्र सदर मुलीच्या आई-वडिलांनी भीती पोटी या प्रकरणी तक्रार तक्रार करण्याचे टाळले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात एवढी मोठी घटना घडली असताना व राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन संपन्न होत असताना यावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या कोणाही प्रमुख नेत्याने आपली चुप्पी तोडलेली नाही हे विशेष ! दरम्यान या प्रकरणी कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांनी लक्षवेधी मांडावी व पावसाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणावी व या घटनेचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून द्यावे व या प्रकरणाची व्याप्ती तपासावी व सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी-अड्.नितीन पोळ,प्रदेशाध्यक्ष,लोकस्वराज्य आंदोलन.
कोपरगाव शहरात,’लव्ह जिहाद’च्या प्रकार उघड झाला असून हिंदू संघटना खडबडून जाग्या झाल्या असल्याचे दिसून आले असून त्यांनी काल गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सुमारे दीड लाख नागरिक,महिला जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते.त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांचे भाषण सुरु असतानाच प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांनी.”आताच एक ‘लव्ह जिहाद’ मध्ये सामील असलेला जिहादी तरुण कोपरगाव पोलिसानी जेरबंद केल्या”ची घोषणा केली होती मात्र तो तरुण कोण या बाबत संदिग्धता राखली होती.त्यामुळे उपस्थितांना नेमका तरुण व तरुणी कोण ? या बाबत चर्चेला मोठे उधाण आले होते.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांची संपर्क करून माहिती काढली असता.सदर मुलगी हि सिन्नर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती मिळाली असून तिच्या भ्रमणध्वनीच्या सहाय्याने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येतील मुस्लिम तरुणाने तिला मोबाईलच्या सहाय्याने चॅटिंग करून आपल्या जाळ्यात अडकवले होते अशी विश्वासपात्र माहिती हाती आली आहे.व तिला घेऊन तो शिर्डी येथे आपल्या दुचाकीवरून जात असताना तिचे व त्या तरुणांचे काही अज्ञात कारणावरून घारी शिवारात शिर्डी लासलगाव रस्त्यावर असलेल्या,’ओम साई लॉन्स’ जवळ मढी ता.कोपरगाव येथे भांडण झाले होते.व तिने उतरून घेतले होते.दरम्यान हे भांडण थेटे सकाळी दूध घालण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी ऐकले होते.व त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन सदर तरुणाला चोप दिला होता.तर काही ग्रामस्थानीं त्यांना नाव गाव विचारले असता सदर तरुणीने नाव सांगण्यास आधी टाळाटाळ केली होती.त्यावर काही ग्रामस्थानीं देर्डे चांदवड येथील एका ग्रामपंचायत पदाधिकारी महिलेला बोलावून तिच्या स्वाधीन ‘त्या’ तरुणीस केले असता तिने आपण सिन्नर येथील असल्याची माहिती दिली होती.त्या वरून तिच्या महाविद्यालयीन ओळ्खपत्रावरील पालकांच्या मोबाईलवर फोन करून नगर येथील पालकांना कळवले होते.तिच्या पालकांनी आपण नगर येथे नोकरी। करत असून तिला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली होती.त्यानुसार त्यांनी पुढील कारवाई केली होती.
दरम्यान कोपरगाव येथील लव्ह जिहादच्या गुुुन्हयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ सामील असल्याने त्याबाबत सत्ताधारी त्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल करुन मागेही कोपरगाव येथील महसुली अधिकाऱ्याने एका आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केला असताना सत्त्ताधारी वर्गाने त्यास पाठीशी घातल्याची घटना फार जुनी नाही.त्यानंतर त्यानेच एका वाळू चोराकडून वीस हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाने अटक केली होती.तरीही सदर अधिकारी अद्याप बडतर्फ केल्याची घोषणा केलेली नाही हे विशेष ! त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे गुन्हेगारावरील प्रेम कुठपर्यंत राहणार ?- नितीन शिदे,सरचिटणीस प्रदेश काँग्रेेेेस
दरम्यान या घटनेतील प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत त्यांनी आधी नावे सांगण्यास टाळाटाळ केल्याचे दिसत असून नंतर तिने बचाव करताना शेवटी ‘तो’ आपला भाऊ असल्याची बतावणी केली होती.मात्र काही ग्रामस्थांना त्यांचा संशय आल्याने व काहींनी त्या तरुणास ‘तो’ कोळपेवाडी येथील असल्याचे ओळ्खल्याने त्यास प्रसाद दिला होता.व पोलिसांना या प्रकरणी खबर देऊन त्या दोन्हीना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले होते.हि घटना नेमकी इकडे मोर्चा रंगात असताना झाली होती.व त्याच वेळी काही इसमानी याची खबर मुख्य वक्ते सुरेश चव्हाणके यांना दिली होती.व त्यांनी आपल्या भाषणात,”आत्ताच एक ‘लव्ह जिहाद’चा आरोपी कोपरगाव पोलिसांनी पकडला असल्या”ची घोषणा केली होती.
दरम्यान या प्रकरणी अधिकची माहिती घेतली असता सिन्नर येथील पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन हिंदू तरुणीचे भा.द.वि.कलम ३६३ अनव्ये अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची नोंद तेथील जबाबदार अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्या नुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सिन्नर पोलिसांना पाचारण केले होते.सिन्नर पोलिसांनी तिच्या पालकांना सोबत घेऊन कोपरगाव येथील तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.त्यानुसार त्यांनी सदर मुलीस पालकांच्या समक्ष सिन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र त्यांनी भीतीपोटी व आपल्या इज्जतीचा फालुदा व्हायला नको म्हणून सदर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या घटनेत आणखी काही तरुणी या तरुणांनी आपल्या जाळ्यात अडवकल्या असून त्यांना या जाळ्यातून बाहेर काढणे गरजेचे बनले असल्याची माहिती काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पालकांनी व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.