गुन्हे विषयक
ग्रामसभेत हाणामारी,महानंदच्या माजी उपाध्यक्षांसह एकवीस जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शासनाने नुकत्याच ग्रामसभा घेण्यास सांगितल्या असता त्या ठिकाणी ग्रामसभेत फिर्यादीने प्रश्न विचारल्याचा राग येऊन त्यास राजेंद्र पंडितराव जाधव,विजय पंडितराव जाधव मानसी राजेंद्र जाधव यांचेसह वीस जणांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खिशातील भ्रमणध्वनी काढून घेतला असल्याचा गुन्हा फिर्यादी संदीप यादव क्षीरसागर (वय-३६) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.यातील फिर्यादी विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला असल्याने यातील आरोपी एकवीस झाले आहे.यात पहिले आरोपी महानंदचे माजी उपाध्यक्ष असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली घराघरात नळाचे पाणी पुरविण्यासाठी लक्ष निर्धारित करण्यात आलेली,”जलजीवन मिशन योजना व स्वच्छ भारत योजनांचा आढावा घेण्यासाठी काल सकाळी राज्य सरकारने ग्रामसभांचे आयोजन केले होते.त्यासाठी अ.नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील सर्वच ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.सांगवी भुसार हे गाव त्या अपवाद नव्हते.त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली असून यात महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांचेसह वीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान या प्रश्नी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने यांचेसह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
पंचायत राजमध्ये ग्रामसभा ही खूप महत्त्वाची सभा असते.हि सभा म्हणजे लोकशाही संस्था आहे.ग्रामस्थांच्या सानिध्यात ग्रामपंचायतचा कारभार हा पारदर्शक व तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात कलम ३(९)मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असे म्हटले आहे.केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली घराघरात नळाचे पाणी पुरविण्यासाठी लक्ष निर्धारित करण्यात आलेली,”जलजीवन मिशन योजना’ व ‘स्वच्छ भारत योजनां’चा आढावा घेण्यासाठी काल सकाळी राज्य सरकारने ग्रामसभांचे आयोजन केले होते.त्यासाठी अ.नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील सर्वच ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान याच घटनेत दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी ग्रामसेवक योगेश काशिनाथ देशमुख यांनी आरोपी संदीप क्षीरसागर याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”ग्रामसभा सुरु असताना आरोपी क्षीरसागर हा त्या ठिकाणी आला व त्याने इतिवृत्त वाचून का दाखवले नाही ? तुम्ही ग्रामसभा लवकर का संपवली ?माझे काही प्रश्न बाकी असताना ग्रामसभा का संपवली ? तुम्ही ठराव का मंजूर केले फिर्यादी ग्रामसेवकांचे अंगावर धावून येवून त्यांची गच्ची धरून शिवीगाळ व धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे व तेथील इतिवृत्त,कच्चे ठरावांचे टिपणे फाडून टाकुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे.
सांगवी भुसार हे ‘संत गाडगे बाबा पुरस्कार’ मिळवलेले गाव त्याला अपवाद नव्हते.त्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली असता त्या ठिकाणी फिर्यादी संदीप क्षीरसागर यांनी काल संपन्न झालेल्या हनुमान मंदिरात ग्रामसभेत मुलांच्या मैदानाबाबत व ग्रामसभेच्या आवक-जावक नोंदणी पुस्तकाबाबत प्रश्न का घेतले नाही ? याची विचारणा फिर्यादी संदीप क्षीरसागर याने केली असता त्याचा राग मनात धरून महानंदचे माजी उपाध्यक्ष आरोपी राजेंद्र पंडितराव जाधव,विजय पंडितराव जाधव,मानसी राजेंद्र जाधव यांचेसह तान्हाजी गोरख जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,जीवन रावसाहेब जाधव,भाऊसाहेब मुरलीधर जाधव,मच्छीन्द्र रामभाऊ जाधव,रोहिदास माधव शिंदे,हरिभाऊ भागुनाथ शिंदे,सुनील परबत शिंदे,विलास रामभाऊ कासार,किशोर बबन जाधव,संदीप बबन जाधव,अजय अशोक जाधव,प्रशांत मोरे(पूर्ण नाव माहिती नाही) बापूसाहेब जाधव (पूर्ण नाव माहिती नाही)साहेबराव पुंजाजी जाधव,मोहन कासार (पूर्ण नाव माहिती नाही) करण नानासाहेब जाधव सर्व रा.सांगवी भुसार आदी वीस जणांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी व चापटेने मारहाण केली असल्याचे त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यातील काही आरोपींना कोपरगाव पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.संदीप बोटे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा अनुक्रमे क्रं.३५३/२०२३ भा.द.वि.कलम १४३,१४७,३२७,३२३,४२७,५०४,५०६ प्रमाणे २ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पो.हे कॉ.बोटे हे करत आहेत.