जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घराचे कुलुप तोडून मोठी चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात चोऱ्या कमी होण्याचे काही नाव घेत नाही अशीच घटना सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून यातील चोरट्यानी आपल्या बंद घराचे कुलूप,कडी-कोयंडा तोडून त्यात प्रवेश करून विविध सोण्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४६ हजार रुपयांचा अवैज घरफोडी करून नुकताच चोरून नेला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी रवींद्र विलासराव सानप (वय-५४) यांनी दाखल केला आहे.त्यामुळे सुरेगाव सह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.अशीच घटना सुरेगाव अंबिकानगर येथे घडली असून अज्ञात चोरट्यांनी यात ४६ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात फरार असलेले आरोपी अटक करण्याचे फर्मान नुकतेच काढले होते.त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस सतर्क झाले आहे.व त्यांनी सावध होऊन गुन्हे करून फरार होणाऱ्या गुन्हेगारांवर आपली करडी नजर रोखली असून या कानकापू दरोडेखोरांवर आपले लक्ष केंद्रित केले होते.त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील त्यामुळे पोलीस अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी कारवाई सुरु केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून त्यातील काही आरोपी जेरबंद केले आहे.त्यात त्यांनी केलेल्या कारवाईत आठ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्हयात सहभागी असलेला आरोपी रोहिदास सहादू बर्डे रा.हिंगणी यास नुकताच शोध घेऊन जेरबंद केले असताना नुकतीच सुरेगाव येथे मोठी घरफोडी झाल्याने उघड झाले आहे.

सदर घटनेत फिर्यादी सानप यांनी म्हटले आहे की,”आपण कोपरगाव तालुक्यातही सुरेगाव हद्दीत अंबिकानगर येथील रहिवासी असून आपण नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे.शनिवार दि.०१ जुलै रोजी आपण बाहेरगावी आपल्या वैद्यकीय उपचारासाठी गेलो असता अज्ञात चोरट्यांनी आपल्या घरात कोणी नाही व आजूबाजूचे कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून आपल्या घराचे कुलूप तोडले व घराचा कडी कोयंडा तोडून घरात आत प्रवेश करून घरातील १० तोळे ७२० मि.ग्रॅम वजणाचे सोन्याचे गंठण,त्यास दोन सोन्याच्या पळ्या,१० हजार रुपये किमतीचे ५.४० ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी,तर ०१ हजार रुपयांची रोख रक्कम त्यात१०० दराच्या दहा नोटा असा एकूण ४६ हजारांचा अवैज लंपास केला आहे.मात्र आपण औषधोपचार घेऊन घरी येण्यास उशीर झाल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी रवींद्र सानप यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३४१/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३०० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close