गुन्हे विषयक
तलवार पाठविणाऱ्या आरोपीवर गुन्हा,आरोपी कोपरगावातील
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हरियाना सोनीपथ येथुन कोपरगाव येथे पार्सलने येणाऱ्या सहा तलवारी अंबड पोलिसांनी घेतल्या ताब्यात कोपरगाव येथील संशयित सचिन मोरे व हरियाना सोनीपथ येथुन तलवार पाठविणारे आदी आरोपींवर गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे आक्षेपार्ह पार्सल हरियाना राज्यातील सोनिपथ येथुन कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आले होते.त्यात सहा तलवारी आहे.त्याचे छायाचित्र सोबत पोलीस अधिकारी प्रमोद वाघ व त्यांचे सहकारी.
भारतीय कायद्यानुसार मिरवणुकीत बंदूक बाळगण्यावर बंदी आहे.जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतरच बंदूक सोबत ठेवण्यासाठी परवानगी आहे.स्वयंपाकघरासाठी वापरण्यात येत नसलेल्या नऊ इंचांपेक्षा जास्त लांबीच्या चाकू आणि ब्लेड यांनाही शस्त्रास्त्र कायद्यानुसार परवाना आवश्यक आहे.परवाना नसताना शस्त्रं बाळगल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे.मात्र या कायद्याची पायमल्ली करत कोपरगाव तालुक्यातील युवक सचिन मोरे याने आपल्या अज्ञात कारणासाठी पार्सलच्या माध्यमातून काही तलवारी मागविल्याची विश्वसनीय खबर प्राप्त झाली आहे.त्यास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
भारतीय कायद्यानुसार मिरवणुकीत बंदूक बाळगण्यावर बंदी आहे.जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतरच बंदूक सोबत ठेवण्यासाठी परवानगी आहे.स्वयंपाकघरासाठी वापरण्यात येत नसलेल्या नऊ इंचांपेक्षा जास्त लांबीच्या चाकू आणि ब्लेड यांनाही शस्त्रास्त्र कायद्यानुसार परवाना आवश्यक आहे.परवाना नसताना शस्त्रं बाळगल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे.मात्र या कायद्याची पायमल्ली करत कोपरगाव तालुक्यातील युवक सचिन मोरे याने आपल्या अज्ञात कारणासाठी पार्सलच्या माध्यमातून काही तलवारी मागविल्याची विश्वसनीय खबर प्राप्त झाली आहे.त्यास पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.सदरचे आक्षेपार्ह पार्सल हरियाना राज्यातील सोनिपथ येथुन कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आले होते.त्यात सहा तलवारी आहे.त्याची गोपनीय खबर अंबड पोलिसांना मिळाली होती.त्या नुसार पोलिसांनी धाड टाकली असता हि गंभिर बाब उघड झाली आहे.सदर पार्सल अंबड पोलिसांनी अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईन्ट येथील एका कुरियर च्या कार्यालयातुन जप्त केले असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.
दरम्यान अंबड पोलिस ठाण्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले,पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार,पोलिस नाईक समाधान चव्हाण,दिनेश नेहे,जनार्दन ढाकणे आदींनी कुरियर कार्यालयास भेट दिली व सहा तलवार असलेले पार्सल जप्त केले.सदर पार्सल नाशिक येथुन कोपरगाव येथे जाणार होते या प्रकरणी अंबड पोलिसांनी कोपरगाव येथील संशयित सचिन मोरे व हरियाना सोनीपथ येथुन तलवार पाठविणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मात्र सदर आरोपीने या तलवारी का मागितल्या हे समजू शकले नाही.