जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

रोहित्रातील ऑइल चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत असललेल्या अभिषेक राजेंद्र गायकवाड यांचे शेतात असलेले महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रातील सुमारे २१ हजार ७०० रुपये किमतीचे २१७ लिटर ऑइल अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचा गुन्हा चांदेकसारे येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोमनाथ निवृत्ती निरगुडे (वय-५०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल केला आहे.

दि.२९ डिसेंबर रोजी ११.२० वाजेच्या सुमारास चांदेकासारे शिवारात राजेंद्र गायकवाड याचे शेतात असलेले विद्युत रोहित्रातील २१७ लिटर ऑइल अज्ञात चोरट्यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी बजाज डिस्कव्हर (एम.एच.१६ ए.यू.१९८६) च्या सहाय्याने चोरून नेले आहे.

अलीकडील काळात कोपरगाव तालुक्यात भुरट्या चोऱ्यांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.नुकतीच संवत्सर शिवारात चोरट्यांनी दोन ठिकाणी चोऱ्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.यातील एका चोरीत पाच हजारांचा डल्ला मारला असताना दि.२९ डिसेंबर रोजी ११.२० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राजेंद्र गायकवाड यांचे शेतात असलेल्या विद्युत रोहित्राच्या आत (कोड क्रं.५७७१८९४) असलेले २१७ लिटर ऑइल आपल्या ताब्यातील दुचाकी बजाज डिस्कव्हर (एम.एच.१६ ए.यू.१९८६) च्या सहाय्याने चोरून नेले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोमनाथ निरगुडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी चोरीचा गुन्हा नोंद क्रं.५२४/२०२२ भा.वि.अधी.२००३चे कलम १३६भा.द.वि.कलम३७९ अन्वये नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसण हे करीत असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close