आरोग्य
…या प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘क्षय’रुग्णांवर उपचार संपन्न

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री क्षयरोग निर्मुलन राष्ट्रीय अभियानांतर्गत संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार व किराणा पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यानी क्षयरोगाबाबत काळजी घेण्याचे व त्यावर मात कशी करायची यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
“क्षयरोगाचे रुग्ण अधिकाधिक शोधण्यासाठी उत्तम रोगनिदानाच्या संभाव्य सेवा सर्वत्र उपलब्ध करणे हा या अभियानातला महत्वाचा उद्देश आहे.राज्य तसेच जिल्हा व तालुका स्तरावरून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शासनाने रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.या अभियानाचा चांगला परिणाम दिसून आला आहे”-डॉ.अनिकेत खोत,प्राथमिक आरोग्य केंद्र,संवत्सर.
संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उपसरपंच विवेक परजणे, तालुका वैद्यकीय अधिकारी घोलप,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत खोत,दिलीप ठेपले,भरत वरगुडे,श्री त्रिभुवन यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दहा क्षयरुग्णांना यावेळी भरत वरगुडे यांनी पोषण आहार म्हणून किराणा पाकिटे वाटप केलीत.
सदर कार्यक्रमास ग्रामस्थ,आरोग्य केंद्राचे अधिकारी,कर्मचारी,रुगणांचे नातेवाईक उपस्थित होते.
क्षयरोग हा एक गंभिर आणि घातक आजार आहे.परंतु वेळीच उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो.म्हणूनच शासनाने या आजाराला सर्वोच्च प्राधान्य दिलेले असल्याचे सांगून डॉ.खोत पुढे म्हणाले,”अधिकाधिक रुग्ण शोधण्यासाठी उत्तम रोगनिदानाच्या संभाव्य सेवा सर्वत्र उपलब्ध करणे हा या अभियानातला महत्वाचा उद्देश आहे.राज्य तसेच जिल्हा व तालुका स्तरावरून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शासनाने रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.या अभियानाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.यात मुख्य भर बेडक्याच्या सूक्ष्मदर्शक तपासणीवर दिला जातो.रुग्णाला उच्च गुणवत्तेची पुरेशी औषधी नियमितपणे आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिली जातात.एकदा रोगनिदान झाल्यावर त्या रुग्णावर योग्य पध्दतीने उपचार करुन त्याला बरा करता येते.सक्षम उपचार करणे हे या उपक्रमाचे मुख्य सूत्र आहे. क्षयरोगाची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन डॉ.अनिकेत खोत यांनी यावेळी केले.