निधन वार्ता
संजीवनीचे संचालक आव्हाड यांचे निधन

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहिवासी व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष आव्हाड यांचे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जेऊर कुंभारी परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व.सुभाष आव्हाड हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष,दोनदा संचालक,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माजी संचालक,जेऊर पाटोदा सेवा संस्थेचे अध्यक्ष,जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य,आदी पदांवर कार्यरत होते.
त्यांना एक जानेवारी रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यांच्यावर शेवटपर्यंत उपचार सुरू होते.मात्र शेवटी वेदना असह्य झाल्याने त्यांनी स्वतःला घरी घेण्याची विनंती आपल्या नातेवाईकांना केली होती.सर्वांना भेटल्यावर दिलासा म्हणून त्यांना संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले होते तेथे कोरोना बरा झाल्याचे निष्पन्न झाले होते.मात्र त्यांना इतर दीर्घ आजार असल्याने त्यांच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद देने बंद केल्याने आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्यावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जेऊर कुंभारी या ठिकाणी गोदावरी तीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नजीकच्या व्यक्तींनी दिली आहे.
त्यांच्या निधनाने कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छीन्द्र केकाण,शिवाजी वक्ते,माजी संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सरपंच रमेश वक्ते आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.