आरोग्य
..या गावात २१५ जणांना कोरोंटाईनचा शिक्का !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतासह जगात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना या साथीवर अद्याप उपाय न सापडल्याने त्यावर जनतेने सामाजिक अंतर राखण्यासह जंतुनाशक फवारणी व आपली स्वच्छता राखण्याचाच पर्याय शिल्लक असल्याने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत जंतुनाशक फवारणी सुरु केली असून आपल्या हद्दीत बाहेर गावातून आलेल्या नागरिकांना कोरोंटाईनचे शिक्के मारून त्यांच्यावर कडक लक्ष ठेवण्याचे काम नुकतेच सुरु केले आहे.ग्रामपंचायतीचे या कामाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ वर पोहोचली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च पासून जनतेला घरातच कोंडून ठेवले आहे.व कोरोनोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय सुचवले असून त्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करून घेण्यास प्रारंभ केला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ वर पोहोचली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च पासून जनतेला घरातच कोंडून ठेवले आहे.व कोरोनोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय सुचवले असून त्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करून घेण्यास प्रारंभ केला आहे.त्याला सुरेगाव हि मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत अपवाद नाही.त्यांनी सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच सुनील कोळपे व ग्रामविकास अधिकारी श्री नारायण खेडकर,तलाठी गणेश गर्कल,पोलीस पाटील संजय वाबळे व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य सेविका सौ.तरोळे,आशासेविका यांनी पुढाकार घेऊन प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी नुकतीच सुरु केली आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १४७ वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.राज्यात रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च पासून जनतेला घरातच कोंडून ठेवले आहे.व कोरोनोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय सुचवले असून त्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करून घेण्यास प्रारंभ केला आहे.त्याला सुरेगाव हि मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत अपवाद नाही.त्यांनी सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच सुनील कोळपे व माजी उपभापती वाल्मिक कोळपे, ग्रामविकास अधिकारी श्री नारायण खेडकर,तलाठी गणेश गर्कल,पोलीस पाटील संजय वाबळे व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य सेविका सौ.तरोळे,आशासेविका यांनी पुढाकार घेऊन प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी नुकतीच सुरु केली आहे.शिवाय भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना व अत्यावश्यक सेवा पूरवणारे मेडिकल स्टोअर,किराणा मालाची दुकाने आदींना त्यांच्याकडे आलेल्या ग्रहाकांसाठी सामाजिक सुरक्षेचे पालन घडविण्यासाठी एक मीटर अंतराची वर्तुळे काढून देऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.त्यामुळे कोरोनाची साथ रोखण्यास मदत मिळणार आहे.
या खेरीज त्यांनी पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सेविका यांना मोफत सॅनीटाईझरचे वाटप केले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री खेडकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.