आरोग्य
…या ठिकाणी जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल व ग्रामपंचायत पालखेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सर्वरोग निदान शिबीर जिल्हा प्राथमिक शाळा पालखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
यात एम.डी.मेडिसिन डॉ.सायली ठोंबरे,नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रशांत सगळगीळे,अस्थिरोगत तज्ञ डॉ.राहुल पारथे,डॉ.पठाण सर व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी शिबिरातील रुग्णांच्या सेवेसाठी होते.बाकी हॉस्पिटलचा परिचारिका कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या शिबिरासाठी मार्केटिंगचे महेश रक्ताटे,उत्तम भागवत यांनी अथक परिश्रम घेतले.१८ मे रोजी शिबिरात झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन अगदी सवलतीच्या दरात म्हणजे ४ हजारात केले जाते.व बी.पी.,शुगर,२ डी इको,अँजिओप्लास्टी,एंजिओग्राफी,मोफत औषधे,बायपास,सवलतीच्या दरात एम.आर.आय,सी.टी स्कॅन.डिजिटल एक्सरे,उपलब्ध केले होते.एकूण शिबिरा ४१० रुग्णांची नोंद झाली असून निष्पन्न झालेल्या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले या योजनेत बसणारे सर्व आजाराचे निदान मोफत केले जातात.नॉर्मल डिलिव्हरी मोफत सिझेरियन अतिशय कमी दरात केले जाते.हॉस्पिटलमध्ये स्टार हेल्थ,आय.सी.सी.पॉलिसी कॅशलेस सेवा उपलब्ध आहे.मेंदूच्या आजारावर उपचार शस्त्रक्रिया,हाडांच्या सर्व आजारांवर उपचार,ब्युरो सर्जरी विभाग,ह्र्दय विकार व मेडिसिन विभाग,दातांच्या सर्व आजारांवर उपचार,जनरल सर्जरी विभाग इत्यादी. सेवा २४ तास उपलब्ध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.