आरोग्य
आयुर्वेदाला आता जगभरातुन मागणी-..या आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड व श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.सतीश भट्टड यांना नुकतेच नेपाळ सरकारच्या नॅशनल आयुर्वेदा ट्रैनिंग अँड रिसर्च सेंटर तर्फे निमंत्रित केले होते त्यांच्या उपस्थितीत दि.१८ एप्रिल ते २० एप्रिल या तीन दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यात नेपाळ देशातील ७० जिल्ह्यापैकी ५० जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे.तसेच भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे.अपचन,हातपाय लचकणे,सूज,खरचटणे इत्यादी छोट्या-मोठ्या तक्रारींपासून ते बाळबाळंतिणीची काळजी संगोपन व उपचारसुद्धा अजूनही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही.आज तोच वारसा डॉ.आव्हाड व त्यांचे अन्यसहकारी हे देशभरासह अन्य देशातही समर्थपणे चालवत आहेत.
या सर्व डॉक्टर्सना आयुर्वेद पंचकर्माचे ट्रेनिंग देण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतातील या दोन आयुर्वेदाचार्यांनी केले.या कार्यशाळेचे उदघाटन त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.देवबहादूर व डॉ.धनिकलाल यांच्या हस्ते झाले.संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.राम आधार यादव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.सदर उदघाटन सत्रामध्ये डॉ.रामदास आव्हाड यांनी आयुर्वेदाचे महत्व विशद करतांना त्या तीन दिवसात देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगची माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात डॉ.देवबहादूर यांनी भारताचे जगातील महत्व अभिमानाने सांगतांना म्हणाले की,”भारताचं आयुर्वेद हे शास्त्र जगाला दिलेली देणगी आहे.भारत हा नेपाळचा मोठा भाऊ असून कोरोना महामारीत १० लाख लसी नेपाळ देशाला मोफत देत मोठ्या भावाची कामगिरी पार पाडली असल्याचे गौरवाने सांगितले आहे.डॉ.रामदास आव्हाड व डॉ.सतीश भट्टड यांच्या आगमनाने उत्साहित झालेले व निमंत्रणापेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेले डॉक्टर्स याची साक्षी देत असल्याचेही शेवटी म्हणाले आहे.
या तीन दिवसात पंचकर्माच्या विविध विषयांवर डॉ.आव्हाड यांची पाच,डॉ.सतीश भट्टड यांची तीन व डॉ.रामदास आव्हाड यांची द्वितीय कन्या डॉ.रिद्धी आव्हाड यांची दोन व्याख्याने संपन्न झाली आहे.दिवसभरात चालणाऱ्या कार्यक्रमात पंचकर्माचे विविध डेमॉन्स्ट्रेशन दाखविण्यात आले.पन्नासहून अधिक आत्यंतिक अवस्थेतील रुग्णांची तपासणी व चिकित्सा देखील डॉ.रामदास आव्हाडांनी केली.
या सांगता समारंभामध्ये डॉ.रामदास आव्हाड,डॉ.सतीश भट्टड व डॉ.रिद्धी आव्हाड यांना स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.उपस्थित सरकारी डॉक्टरांनी प्रतिक्रिया स्वरूप बोलतांना तीन दिवसात मिळालेल्या ज्ञानाचा व त्या प्रत्यक्ष कर्मामुळे किती तरी अधिक आत्मविश्वास वाढल्याचे सांगतांना पुढील वर्षी पुन्हा डॉ.आव्हाडांच्या टीमला निमंत्रित करण्यात यावे अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षांना केली.डॉ रामदास आव्हाडांनी त्यांची मागणी मान्य करत ज्या आयुर्वेदामुळे आज या स्थानापर्यंत पोहोचलो त्या आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
नेपाळ येथील प्रसिद्ध माध्यमांनी देखील “नेपाळच्या जनतेच्या आरोग्यासाठी भारताचे आयुर्वेद मदतीला “या शीर्षकाखाली वार्ताकन केले.नगर जिल्ह्यातील डॉ.रामदास आव्हाड व डॉ.सतीश भट्टड यांच्या देशा बाहेरील या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.