जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आणखी एक बाललैंगिक अत्याचार प्रकरण,कोपरगावात शिक्षकावर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील शाळेतील शिक्षक (वय-४७) आरोपी विरुद्ध शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीसोबत (वय-१३) बाल लैंगिक अत्याचार छळ केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला पॉक्सो कायदा आता आणखी कडक करण्यात आला आहे.या कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने सन-२०१८ मध्ये मंजुरी दिली असून त्यानुसार आता बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आहे.मुलांना शारीरिक, मानसिक,सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे.याशिवाय पीडित मुलांना न्यायालयातील सुनावणीच्या काळात व आवश्यकतेसुनार सर्व टप्प्यात संरक्षण पुरविण्यात येते.मात्र तरीही या कायद्याचा धाक असल्याचे दिसत नाही या गुन्ह्यात वरचेवर वाढ होताना दिसत आहे हे विशेष !

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला पॉक्सो कायदा आता आणखी कडक करण्यात आला आहे.या कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने सन-२०१८ मध्ये मंजुरी दिली असून त्यानुसार आता बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आहे.मुलांना शारीरिक, मानसिक,सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे.याशिवाय पीडित मुलांना न्यायालयातील सुनावणीच्या काळात व आवश्यकतेसुनार सर्व टप्प्यात संरक्षण पुरविण्यात येते.मात्र तरीही या कायद्याचा धाक असल्याचे दिसत नाही या गुन्ह्यात वरचेवर वाढ होताना दिसत आहे.अशीच घटना शिर्डी,संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी आणि त्यानंतर आता कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील शाळेत घडली आहे.

सदर मुलगी (वय-१३) हि वारी परिसरातील शाळेत शिक्षण घेत असून सदर शिक्षकाने तिला शाळा भरण्यापूर्वी बोलावून तिला,”तू,शाळेत लवकर येत जा,”तसेच तू मला भेटत जा”,मला सोडून जाऊ नको”,तू रंगीत ड्रेसवर फार छान दिसतेस”,”शर्टचे बटन उघडे ठेवत जा” असे म्हणून तिचे वेळ मिळेल त्यावेळी पाठीवरून हात फिरवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.त्यामुळे सदर शिक्षकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत तिच्या फिर्यादी आईच्या वतीने (वय-४५) कोपरगाव यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर फिर्यादी कोपरगाव येथील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या प्रकरणी शालेय अंतर्गत तक्रार समितीने चौकशी केलेली असून त्यात प्राथमिक अहवालात तथ्य आढळून आले आहे हे विशेष !

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२८६/२०२२ भा.द.वि.कलम ३५४(अ)(आय) सह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपीस शिक्षकास कोपरगाव तालुका पोलिसांनी काल रात्री ११.३६ वाजता अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close