जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या आजाराची प्रतिबंध जनजागृती संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


अहिल्यानगर (प्रतिनिधी )


   जागतिक एडस् दिनानिमित्त समाजात व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्याकरिता जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत शहरात एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

“समाजात एचआयव्ही एडस् संदर्भात जनजागृती करवण्यासाठी महाविद्यालयीन युवक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.यामुळे पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवता येईल”-डॉ.बापुसाहेब नागरगोजे,आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद.

   रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.रॅलीस जिल्हा रुग्णालयातून प्रारंभ होऊन अप्पू हत्ती चौक-सर्जेपुरा-बागडपट्टी-सिद्धी बाग-न्यू आर्ट्स कॉलेज अप्पू हत्ती चौक मार्गे-जिल्हा रुग्णालयात  समारोप करण्यात आला.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वैजनाथ गुरवले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक (बाहय संपर्क) डॉ.शिवशंकर वलांडे,रुग्णालय व्यवस्थापक डॉ.मनोज घुगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव,समन्वयक अधिकारी डॉ.निलेश गायकवाड,श्रीमती छाया जाधव,अजय विष्टे,प्रशांत येनडे आदी उपस्थित होते.

तरुणांनी वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यात एचआयव्हीबाबत योग्य ज्ञान प्राप्त करून कोणत्याही चुकीच्या निर्णयांना टाळावे.एचआयव्ही एडस् प्रतिबंध व निमंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सध्या आपण अधिक सुरक्षित जीवन जगत आहोत,असे डॉ.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

   रॅलीत ईव्हॅन्जलीन बुच हॉस्पीटल,आनंदऋषी हॉस्पीटल,न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायंन्स महाविद्यालय,नर्सिंग कॉलेज,जिल्हा रुग्णालय,स्नेहालय टिआय संस्था,श्री. अमृतवाहिनी ग्रामीण विकास मंडळ अमृतदिप प्रकल्प,प्रयत्न नर्सिंग कॉलेज,ताराबाई नर्सिंग कॉलेज,ए.ई सोसायटी अध्यापक विद्यालय,पेमराज सारडा कॉलेज,सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय,रोटरी क्लब मिडटाऊन,दादासाहेब रुपवते कनिष्ठ महाविद्यालय,डॉ.विखे पाटील नर्सिंग महाविद्यालय,सेंट मोनिका अध्यापिका महाविद्यालय,श्री छत्रपती शिवाजी महाराज इंजिनियरिंग कॉलेज,अध्यापक विद्यालय दिल्ली गेट,एनएडिपी संस्था विहान प्रकल्प व विश्व भारती अभियांत्रिकी महाविद्यालय आदी संस्थेमधील डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एडस् प्रतिबंध व नियंत्रणाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्याचे यावेळी सादरीकरण केले.

   सदर प्रसंगी प्रास्ताविकात शिवाजी जाधव यांनी जिल्ह्यातील एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभागाद्वारे झालेल्या कामांची आणि उपलब्ध सेवांची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close