आरोग्य
कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात रुग्णवाढ जोरात !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४८१ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०७ रुग्ण बाधित आढळले असून ४७४ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५४७ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०७ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ०९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान आज आलेल्या अहवालात गोधेगावात रुग्णांनी उचल खाल्ली असून या गावात ३ पुरुष व एक महिला असे ०४ रुग्ण बाधित आले आहे.तर येसगावात
दोन महिला बाधित आढळल्या आहेत.तर या खेरीज मंजूर,धोत्रे,आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळले आहे.तर कोपरगाव शहरात केवळ सुभाषनगर येथे एक पुरुष बाधित आढळला आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ३१४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १४१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ८१ हजार १३० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०७ लाख २४ हजार ५२० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.९० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५० टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख २५ हजार ९३१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार १०० झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख १४ हजार ०५५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ७७५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे. दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण ग्रामीण भागात बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.