आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढीला उतार,पोहेगाव गट आघाडीवर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५८१ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १८ रुग्ण बाधित आढळले असून ५६३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५०८ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत १८ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.दरम्यान पोहेगाव जिल्हा परिषद गटात सर्वाधिक ०८ रुग्ण आहे.त्यात बहादरपूर येथे सर्वाधिक ०७ रुग्ण नोंदवले गेले आहे.मात्र बहुतांशी रुग्ण घरीच खाजगी उपचार घेऊन बरे होत असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे खरी आकडेवारी समोर येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.रांजणगाव देशमुख,जवळके आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण सल्याची माहिती उपलब्ध होत आहे. तर कोपरगाव शहरात ०२ रुग्ण बाधित आढळले आहे.मळेगाव थडी येथे ०४ रुग्ण आहे.तर मुर्शतपुर,हंडेवाडी,जेऊर पाटोदा,जवळके,कान्हेगाव,कोकमठाण,धारणगावं येथे प्रत्येकी ०१ रुग्ण आढळले आहे.हि संख्या अलीकडील काळातील मोठी आहे.तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ०४० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १८० रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५५ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ७० हजार ८२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ८३ हजार ३१२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.२२ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ६६३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.१७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख १९ हजार ०८७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ०२७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०६ हजार ३८९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ६७० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.