आरोग्य
कोपरगावात कोरोनाची अल्पशी वाढ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ४८७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ९६ हजार ९९८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ८७ हजार ९९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १२.८७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार १८७ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६० टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६८ हजार ७११ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ८७३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ६० हजार ३६७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ४७० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे. कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येणार आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.राजकीय पक्षांनी आपले आंदोलने सुरू केल्याने त्यावर उच्च न्यायालयाने सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओढले आहे.हि चिंताजनक बाब आहे.