आरोग्य
कोपरगावात अल्प रुग्णवाढ सुरूच
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३३४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०० रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८४ हजार १४८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ३६ हजार ५९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.६६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०३२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५५ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६३ हजार ६९८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ९७५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५४ हजार ५४८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार १७४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केलेली शनिवारची “जनता संचारबंदी” कापड व तत्सम व्यापाऱ्यांनी हरकत घेतल्याने वैतागून मागे घेतल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.विविध संघटना व कार्यकर्ते यांनी आपल्या सोयींच्या वाराची मागणी केल्याने शहरात गोंधळ उडाला होता.त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांची हि संतप्त प्रतिक्रिया मानली जात आहे.त्यानंतर कोपरगाव व्यापारी महासंघ काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.