शैक्षणिक
सी.बी.एस.ई.चा शालांत परीक्षेचा निकाल जाहीर,..या संस्थेचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव सी.बी.एस.ई.चा २०२१-२२ चा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नगर जिल्ह्यात बाजी मारत सुजल कृष्णा फुलसुंदर याने ९८.४ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्येच नव्हे तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला तर अन्वय प्रशांत बारहाते याने ९७.०२ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सिद्धांत प्रीतम जोशी याने ९७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला असल्याचा संस्था चालकांनी दावा केला आहे.
समता स्कूल मधील ४ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यामध्ये सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते,सिद्धांत जोशी,नील भुतडा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.९० ते ९५ टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे १६ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते,कुलदीप कोयटे,जानवी जानी यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले,हिंदी विषयात सिद्धांत जोशी याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.गणित विषयात सुजल फुलसुंदर याने १०० पैकी १०० गुण तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अ.’नगर जिल्ह्यात सलग सहाव्यांदा अव्वल ठरत स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.
समता स्कूल मधील ४ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यामध्ये सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते,सिद्धांत जोशी,नील भुतडा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.९० ते ९५ टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे १६ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते,कुलदीप कोयटे,जानवी जानी यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले,हिंदी विषयात सिद्धांत जोशी याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.गणित विषयात सुजल फुलसुंदर याने १०० पैकी १०० गुण तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले.
विज्ञान विषयात सिद्धांत जोशी,निनाद शिंदे यांनी १०० पैकी ९९ गुण तर समाजशास्त्र या विषयात जानवी जानी हिने १०० पैकी १०० गुण मिळविले तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.नील भुतडा,सर्वेश कांगणे,निनाद शिंदे,जय वर्पे,राजहंस आढाव,उन्नती भवर,अरफात देशमुख,माऊली काळे,मानव अग्रवाल,रौनक जैन,नंदिनी कलंत्री,जानवी जानी,कुलदीप कोयटे,खुशी कोठारी,अजिंक्य मिसाळ,म्रीदुला सोनकुसले,कुशल छाजेड या विद्यार्थ्यांनी ही ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे.गत वेळी याबाबत संस्थेने चुकीचा दावा केला होता त्यामुळे वादंग निर्माण झाले होते.
‘समता इंटरनॅशनल स्कूलची ही इ.१० वीची ६ वी बॅच असून या वर्षीच्या निकालासह जिल्हयात अग्रणी राहण्याची परंपरा कायम राखली आहे.या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य,प्राचार्या शिल्पा जेजुरकर,उपप्राचार्य समीर अत्तार आदीनी अभिनंदन केले आहे.