जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यात रोज शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे त्याला उतार येत आहे.कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५६९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५६३ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४५४ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०६ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०० असे एकूण अहवालात एकूण ०६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यातील एकाही रुग्णाचे निधन झाले नाही.दरम्यान जनता संचारबंदीचा वार नागरिक व व्यापारी यांच्या मागणीनुसार आता रविवार ऐवजी आता दि.१९ जून पासून शनिवारी करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे त्यामुळे हि संचारबंदी नागरिक किती उत्साहाने पाळतात याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.या खेरीज नागरिक व व्यापारी यांनी अधिकची वेळ नियंत्रित केली तर त्याचा दीर्घकालीन फायदा मिळणार आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३०४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ९४ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८२ हजार २२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख २८ हजार ९१२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.९६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ००८ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५९ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६२ हजार ४९७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ८२९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५२ हजार ७१० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०४ हजार ९५७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यात आज पुन्हा वाढ होऊन १० हजारांच्या आत रुग्णवाढ आली आहे.कोकणातील काही जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना तालुक्यात आता मृत्यू पावणारी संख्या रोडावली असून मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या नुकतीच २०२ झाली आहे.त्यामुळे आगामी काळात सतर्कता बाळगावी लागणार आहे.नगर जिल्हा टाळेबंदीतून उठवला असल्याने नागरिकांनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असले तरी या उत्साहाच्या भरात नागरिकांनी खरेदीसाठी मोठी झुंबड उडवली होती ती आता दुपारनंतर कमी झाल्याचे दिसते आहे.त्यामुळे या गर्दीचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.शिवाय व्यापाऱ्यांनीं आता बंद वार रविवार ऐवजी शनिवार केला आहे त्याचे सलून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.दुकानाची वेळी नियंत्रित करण्याची खरंच गरज आहे का ? याचा आता नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी व्यापक हितासाठी निर्णय घेण्याची गरज आहे तसे झाले तर शहर व तालुक्याच्या हितासाठी एक आदर्श निर्माण होऊन आगामी काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास मदत होणार आहे.रुग्ण वाढही रोखली जाऊन जीवित व आर्थिक हाणी मर्यादित करण्यास मदत मिळणार आहे.