जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ६०५ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५९६ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४६२ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १९ तर अँटीजन तपासणीत ०९ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात एकूण २५ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यात आज करंजीत एक ७० वर्षीय रुग्णाचे निधन झाले आहे.त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या नागरिकांनी द्विशतक पूर्ण केले आहे.मात्र टाळेबंदी उठवल्याने नागरिकांनी गर्दी केली असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढून जास्तीची चिंता वाढली आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार २०४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ३९५ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ७५ हजार ४२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ०१ हजार ६९६ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १६.१८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार ६०९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९५.१२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५८ हजार ४८७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९५५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ४९ हजार ९२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ६०८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यात आज पुन्हा वाढ होऊन १२ हजारांच्या वर रुग्णवाढ झाली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना तालुक्यात गत काही दिवसात एकही बळी गेला नव्हता मात्र करंजीच्या रुग्णांची आज भर पडून आता मृत्यू पावणारी संख्या २०० झाली आहे.त्यामुळे आगामी काळात सतर्कता बाळगावी लागणार आहे.नगर जिल्हा टाळेबंदीतून उठवला असल्याने नागरिकांनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असले तरी या उत्साहाच्या भरात नागरिकांनी खरेदीसाठी मोठी झुंबड उडवली आहे.त्यामुळे या गर्दीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून रुग्ण संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.यावर प्रशासनाने आता रविवार बंदचे पाऊल उचलले आहे शिवाय व्यापाऱ्यांची दुकानाची वेळी नियंत्रित केली आहे.त्यामुळे आगामी काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास मदत होणार आहे.