आरोग्य
कोपरगावात पुन्हा मोठी रुग्णवाढ,मात्र एकही मृत्यू नाही
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ८९४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ५१२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १८९ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५९ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ६३ हजार ४४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ५३ हजार ७८० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १८.७५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार १९३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९४.११ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ४९ हजार ४१३ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १० हजार ९१९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ३५ हजार ४५४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ०३९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.राज्यातील रुग्णवाढ प्रथमच वीस हजारांच्या दरम्यान आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज पुन्हा तीन बळी गेल्याने हि बाब चिंता निर्माण करणारी आहे.त्यामुळे आगामी काळ उज्वल असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित ११ जिल्ह्यात समाविष्ठ आहे.त्यामुळे नगर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.दरम्यान उद्या दिनांक २९ मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोवीशील्ड लसीच्या डोसाबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही ती उपलब्ध झाल्यानंतर वाचकांना पोहचवली जाईल.